‘बिग बॉस मराठी’ हा शो छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस मराठी २’ चा विजेता शिव ठाकरे हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. शिवा हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच शिवने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शिव बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री मलायका अरोरासोबत दिसत आहे. त्यांचा हा रोमॅन्टिक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
शिवने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मलायकाने पिवळ्या रंगाचा फ्लोअर ड्रेस परिधान केला आहे. तर त्यावर मरुम रंगाचं जॅकेट परिधान केलं आहं. तर शिवने मलायकाच्या जॅकेटला मॅच होईल असा कोट परिधान केला आहे. त्यांच्या हा रोमॅन्टिक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : ‘कालचा एपिसोड बघून वाईट वाटलं ना…’, परी आणि मामीचा भन्नाट श्रीवल्ली डान्स पाहिलात का?
आणखी वाचा : “मुस्लीम नाही तर काय झालं, नमाज पठण…”, लहान मुलीचे बोल ऐकून पल्लवी जोशीला बसला धक्का
शिव आणि मलायकाने बॉलिवूकड अभिनेता शाहरुख खानच्या ओम शांती ओम या चित्रपटातील ‘आखो मे तेरी अजब सी’ या रोमॅन्टिक गाण्यावर हा व्हिडीओ शूट केला आहे. दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मलायकाच्या चाहत्यांमध्ये तर एक वेगळीच चर्चा रंगली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत मलायका एण्ट्री करणार असल्याचे चाहते म्हणत आहेत.