वय हा फक्त आकडाच असतो हे अभिनेत्री मलायका अरोराला पाहिल्यावर लक्षात येतं. मलायकाने वयाची ४५शी पार केली आहे. तरीही तिचं सौंदर्य, तिचा लूक तरुण अभिनेत्रींना लाजवणारा आहे. फॅशनच्याबाबतीत तर मलायका वेगवेगळे प्रयोग करताना दिसते. मलायकाचे हटके डिझायनर गाऊन, ड्रेस, साडी चर्चेचा विषय ठरत असतात. पण बऱ्याचदा मलायकाला तिच्या कपड्यांमुळे ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. आता देखील असंच काहीसं घडलं आहे.
मलायकाने नुकतंच पांढऱ्या रंगाच्या ट्रान्सपरंट साडीमध्ये हॉट फोटोशूट केलं. यादरम्यानचे तिचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच मलायकाने देखील तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे या साडीमधील फोटो शेअर केले आहेत. पण पांढऱ्या रंगाच्या साडीमधील तिचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मलायकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला मलायकाने हजेरी लावली होती. यावेळी पापाराझी छायाचित्रकारांनी तिला घेरलं. यादरम्यानचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर कमेंट करण्यास सुरुवात केली. या व्हिडीओमध्ये मलायकाने मेकअप अधिक केल्याचं दिसत आहे. हेच पाहून नेटकऱ्यांनी तिला कमी मेकअप करण्याचा सल्ला दिला आहे.
आणखी वाचा – राणादा-पाठकबाईंची लग्नापूर्वी लंडन ट्रिप, प्रेमात आकंठ बुडालेल्या सेलिब्रिटी कपलची चर्चा
एका युजरने म्हटलं की, “इतकं फाउंडेशन का लावलं आहे?”, तर दुसऱ्या युजरने म्हटलं की, “आज हिचा चेहरा काहीतरी वेगळा दिसत आहे.” मलायकाच्या या नव्या लूकचं काही जणांनी कौतुक देखील केलं आहे. मलायकाला तिच्या लूकमुळे बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण ट्रोलर्सकडे पाठ फिरवत ती आपल्याला आवडणारे कपडेच परिधान करते. खरं तर हिच मलायकाची खासियत आहे.