Actress Renjusha Menon found dead : मल्याळम अभिनयसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनेक मालिका व चित्रपटांसाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री रेंजुशाचं निधन झालं आहे. रेंजुशा मेनन राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली आहे. आज (३० ऑक्टोबर रोजी) तिच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. ती पती मनोजबरोबर राहत होती.

“मी तिच्याइतकी सुंदर नाही पण…”, ‘या’ अभिनेत्रीने साकारावी आपली भूमिका, सुधा मूर्तींची इच्छा

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, रेंजुशा ३५ वर्षांची होती. केरळमधील थिरवनंतपुरम येथील करियम येथील तिच्या फ्लॅटमध्ये ती मृतावस्थेत आढळली आहे. रेंजुशाच्या पश्चात पती, आई आणि वडील असा परिवार आहे. तिच्या आकस्मिक निधनाबाबत इतकीच माहिती सध्या समोर आली आहे. केरळ पोलीस आता तिच्या निधनाची चौकशी करत आहेत. रेंजुशाच्या मृत्यूने तिच्या कुटुंबीयांना आणि सहकलाकारांना मोठा धक्का बसला आहे.

राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली प्रसिद्ध अभिनेत्री, पोलीस म्हणाले…

‘सिटी ऑफ गॉड’, ‘मेरीकुंडोरू कुंजाडू’, ‘बॉम्बे मार्च’, ‘कार्यस्थान’, ‘वन वे तिकीट’, ‘अथभूता द्विपू’ यासह अनेक टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमधील तिच्या सहाय्यक भूमिकांसाठी रेंजुशा प्रसिद्ध आहे. ‘मनोरमा’ने दिलेल्या माहितीनुसार, रेंजुशा गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत होती. तिने मल्याळम चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त टेलिव्हिजन मालिकांसाठी लाइन प्रोड्युसर म्हणूनही काम केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीही अशाच रितीने एक मल्याळम अभिनेत्री अपर्णा पी नायर तिरुअनंतपुरममधील करमना येथील तिच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती. १ सप्टेंबर रोजी ही दुर्दैवी घटना समोर आली होती. दोन लहान मुलींची आई असलेल्या ३३ वर्षांच्या अपर्णाच्या निधनाबद्दल पोलिसांनी आत्महत्येचा संशय व्यक्त केला होता.