मल्याळम अभिनेता श्रीजीथ रवीला अश्लील वर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलीय. अभिनेता श्रीजीथ हा अभिनेते टी.जी. रवी यांचा मुलगा आहे. अप्लवयीन मुलींसमोर अश्लील वर्तन केल्याप्रकरणी केरळमधील त्रिशूर पोलिसांनी श्रीजीथला अटक केली असून त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत कारवाई सुरु करण्यात आलीय.

यापूर्वी देखील २०१६ सालामध्ये श्रीजीथला अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा श्रीजीथवर कारवाई करण्यात आलीय. ४ जुलै रोजी ही घटना घडली होती. पोलिसांच्या माहितीनुसार दोन लहान मुलींनी एका व्यक्तीने असभ्य वर्तन केल्याची तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार या व्यक्तीने गाडी बाहेर येऊन अल्पवयीन मुलींसमोर गुप्तांग दाखवले असं सांगण्यात आलंय. त्यानंतर त्रिशूर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कार नंबर मिळवून पोलिसांनी या व्यक्तीचं घरं गाठलं असता ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेता श्रीजीथ रवी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


एका वेब पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार श्रीजीथ सध्या या विकृतीसाठी उपचार घेत असल्याचं त्याने कबुल केलंय.श्रीजीथ विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. श्रीजीथने इंजिनियरिंंगंच शिक्षण घेतलंय. त्यानंतर २००५ सालामध्ये त्याने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. आतापर्यंत त्याने जवळपास ७० सिनेमांमध्ये काम केलंय.