लहान मुलं त्यांच्या बाललीलांमुळे कायमच सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतात. त्यामुळे कलाविश्वातही असे अनेक स्टारकिड आहेत जे कायमच सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत असतात. यामध्ये बॉलिवूड स्टारकिड्स सगळ्यांनाच माहित आहेत. मात्र, मराठी कलाविश्वातदेखील असे अनेक स्टारकिड्स आहेत जे कायम चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतात. यातलंच एक नाव म्हणजे आदिनाथ व उर्मिला कोठारे यांची लेक जिजा.
सोशल मीडियावर जिजा ही कायमच चर्चेचा विषय ठरत असते. अनेकदा उर्मिला किंवा आदिनाथ जिजाचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. यामध्ये अलिकडेच आदिनाथने जिजाचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जिजा निरागसपणे कबुतरासोबत गप्पा मारताना दिसत आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये जिजा कबुतराला तांदळाचे दाणे खायला देत असून त्याच्याशी गप्पा मारताना दिसत आहे. विशेष म्हणजे तू शिजलेला भात खाणार का असा प्रश्नही त्याला विचारते. तर मध्येच बाबा, हा बोलतच नाही माझ्याशी अशी मिश्कील तक्रारदेखील करते. त्यामुळे सध्या जिजाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, सध्याच्या घडीला मराठी कलाविश्वातील लोकप्रिय स्टारकीडपैकी जिजा आघाडीवर आहे. यापूर्वीदेखील तिचे असे अनेक व्हिडीओ आदिनाथने शेअर केले असून ते व्हायरल झाले आहेत.