आदिनाथ कोठारे हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले नावं म्हणून ओळखले जाते. आदिनाथने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तो केवळ एक अभिनेता नव्हे तर दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही घराघरात प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी आदिनाथ कोठारेची प्रमुख भूमिका असलेला चंद्रमुखी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याने दौलतराव देशमाने ही प्रमुख भूमिका साकारली होती. त्याबरोबरच ८३ या बॉलिवूड चित्रपटातही त्याने काम केले होते. त्याची ही भूमिकाही प्रचंड गाजली. नुकतंच आदिनाथने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बद्दल पोस्ट शेअर केली आहे.

आदिनाथ हा इन्स्टाग्रामवर कायम सक्रीय असतो. नुकतंच त्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बद्दल एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने घाट-रस्त्यांवरील ड्रायव्हिंगबद्दल सांगितले आहे. यात आदिनाथने स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे. याला त्याने हटके कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : “१० वर्षांनंतर मला तुरुंगात टाकले तेव्हा…” केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

आदिनाथ कोठारेची इन्स्टाग्राम पोस्ट

“लहानपणी मुंबई पुण्याचा जुना घाट चढत अस्ताना माझी आज्जी सतत देवाचं नाव घेत रहायची. प्रत्येक वळणावर तीची श्रद्धा आणी तीची काळजी वाढत जायची. मी मागच्या सीटवर तीच्या आणि आईच्या मधे बसायचो. मला ती सगळी स्तोत्र पाठ झाली होती आणी मी पण गम्मत म्हणून तीच्या सोबत म्हणायचो.

आज आज्जी खूप म्हातारी झालीये आणी तीला ती स्तोत्र कदाचीत आठवतही नसतील. पण तो घाट आजही आहे. रस्ता जरा सोयीचा झाला असला तरी ती वळण तशीच आहेत. त्या वळणांवरून जाताना आज गाडीत आज्जी नस्ते. पण ती स्तोत्र आपोआप आठवतात. मी मनातल्या मनात म्हणतो. अचानक खूप सुरक्षित वाटायला लागतं. आपल्या आज्जीच्या आणि आईच्या कुशीत बसून मी प्रवास करतोय असं वाटतं.

आयुष्याच्या प्रत्येक घाटात मला हा भास होतो”, असे कॅप्शन आदिनाथ कोठारेने दिले आहे.

आणखी वाचा : “गेले काही महिने तो…” ‘मुरांबा’ मालिकेतील अभिनेत्याच्या पत्नीने उघड केले पतीचे गुपित, पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आदिनाथ कोठारे हा सध्या त्याच्या नव्या कंपनीच्या कामात व्यस्त आहे. आदिनाथने कोठारने काही दिवसांपूर्वी कोठारे व्हिजनच्या नव्या कंपनीची घोषणा केली आहे. स्टोरीटेलर्स नूक असं या नव्या कंपनीचं नाव आहे. याबरोबरच त्याने आपल्या नव्या कंपनीच्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टरदेखील शेअर केलं आहे. बेनं असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शक आणि सहनिर्माते नितीन दीक्षित आहेत. तर आदिनाथ कोठारे याचा निर्माता आहे. तसेच भारतातील कान्ससाठी निवडलेल्या ५ चित्रपटांपैकी एक चित्रपट बेनं आहे.