scorecardresearch

अभिनेते किरण मानेंनी शेअर केला नागराज मंजुळेंसोबतचा खास फोटो, म्हणाले…

नुकतंच त्यांनी फेसबुकवर नागराज मंजुळेंसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

अभिनेते किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकले. यानंतर राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली, असा आरोप किरण माने यांनी केला होता. त्यानंतर किरण माने हे चर्चेत आहे. त्यानंतर ते फेसबुकवर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतंच त्यांनी फेसबुकवर नागराज मंजुळेंसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

अभिनेते किरण माने हे फेसबुकवर कायमच चर्चेत असतात. ते नेहमी फेसबुकवर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. काही तासांपूर्वी त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेंसोबतचा एक कोलाज फोटो शेअर केला आहे. यातील पहिल्या फोटोत ते दोघे हातात हात घालून कोणत्या तरी विषयावर गप्पा मारत असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोत नागराज मंजुळे हे किरण मानेच्या भूमिकेचे कौतुक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर तिसऱ्या फोटोत ते दोघेही छान हसत सेल्फी काढताना दिसत आहेत.

नागराज मंजुळेंसोबत शेअर केलेल्या या फोटोला त्यांनी हटके कॅप्शनही दिले आहे. ‘जाळ न् धूर संगट !’ असे त्यांनी कॅप्शन देताना म्हटले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असल्याचे दिसत आहे. या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे.

‘झुंड’ चित्रपट पाहिल्यानंतर किरण मानेंची फेसबुक पोस्ट, म्हणाले “नागराज तू…”

दरम्यान काही दिवसांपूर्वी किरण माने यांनी नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी नागराज मंजुळे आणि ‘झुंड’ चित्रपटाचे कौतुक केले होते. विशेष म्हणजे यासोबत त्यांनी नागराज मंजुळे यांची एक कविताही शेअर केली होती.

दरम्यान किरण माने यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आले होते. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली, असा आरोप किरण माने यांनी केला होता. यानंतर किरण माने हे सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actor kiran mane share special photo with nagraj manjule with interesting caption nrp

ताज्या बातम्या