‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. कॉमेडी किंग अशी त्याची ओळख सांगितली जाते. काही दिवसांपूर्वीच ओंकार भोजनेचा ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच तो रोमान्स करताना दिसून आला आहे. अभिनेत्री ईशा केसकरबरोबर त्याचं रोमँटिक गाणं सध्या चर्चेत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याने रोमान्सवर भाष्य केलं आहे.

ओंकार त्याच्या ‘सरला एक कोटी चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त एका रेडिओ चॅनेलवर गेला होता. त्याच्याबरोबर ईशा केसकरदेखील होती. तेव्हा त्याला प्रश्न विचारण्यात आला की “तू तुझ्यात इतका रोमान्स कुठून आणलास? तुला गर्लफ्रेंड आहे का? त्यावर ओंकारने उत्तर दिले, “मुळात चित्रपटाच्या गोष्टीत रोमान्स आहे. या चित्रपटाच्या संवाद लेखकांनी हे मनापासून संवाद लिहले आहेत. आम्ही साधे संवाद म्हणतानादेखील भावुक व्हायचो.”

Valentine day : कधी विरह, कधी जवळीक…प्रेमात पडायला लावणारे बॉलिवूडचे ‘हे’ अजरामर चित्रपट; तुम्ही पाहिलेत का?

तो पुढे म्हणाला, “रोमान्स करण्याचा वाढीव प्रयत्न मी काही केलेला नाही, मला तो झेपला ही नसता. कारण मी स्वतःला रोमान्स हिरो तितक्या ईशा म्हणाली शाहरुख मी स्वतःला समजत नाही. जे आपल्याकडे आहे ते जो लावून करायचं.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली. या मुलाखतीत त्याने महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेवरदेखील भाष्य केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सरला एक कोटी’ या चित्रपटात ओंकार भोजने, ईशा केसरकर मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. तसेच या चित्रपटाची कथा ग्रामीण भागावर आधारित असल्याचं टीझर पाहिल्यानंतर लक्षात येतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन सिंधु विजय सुपेकर यांनी केलं आहे.