बॉलिवूडप्रमाणे मराठी अभिनेतेदेखील चर्चेत असतात. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका, चित्रपट यांमुळे ते प्रेक्षकांची मनं जिंकतात. मराठमोळा अभिनेता पुष्कर जोग सध्या लंडनमध्ये एका मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. सोशल मीडियावर त्याने लंडनचे फोटोदेखील शेअर केले होते. नुकतीच त्याने एका मराठी अभिनेत्याची पोस्ट लिहली आहे. ज्यात त्याने अभिनेत्याचे कौतुक केले आहे.
पुष्करने कुशल बद्रिकेबरोबरच फोटो शेअर करत त्याचे कौतुक केले आहे तो असं म्हणाला की ‘मित्रा तुझ्या अभिनयाच्या उंचीपर्यंत मी पोहचू शकेन का हे . माहित नाही पण तुझ्यासारख्या मित्राबरोबर स्क्रीन शेअर करताना मला प्रचंड आनंद होत आहे.’ अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे तो घराघरात पोहोचला. कुशल बद्रिकेने आजवर अनेक प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. सध्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तो लंडनला गेला आहे.
पुष्कर जोगने ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटातून पदार्पण केले आहे. ‘ती अँड ती’, ‘अदृश्य’, ‘वेल डन बेबी’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. तसेच ‘हम दोनो’, ‘डोन्ट वरी बी हैप्पी’, ‘ईएमआय’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. त्याने प्रसिद्ध कार्यक्रम ‘बिग बॉस’ मराठीमध्ये त्याने भाग घेतला होता. पुष्कर पेशाने डेंटिस्ट आहे.