मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून सुबोध भावेला ओळखले जाते. सुबोध भावेने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच सुबोध भावेने पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. याबाबत त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुबोध भावे हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. नुकतंच सुबोधने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने पुणे मेट्रो आणि त्याचे काम पाहतानाचे काही फोटो शेअर केले आहे. यात त्याच्यासोबत त्याची पत्नी मंजिरी भावे देखील पाहायला मिळत आहे. या फोटोला त्याने फार हटके कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : “अजून प्रवास मोठा आहे पण…”, अभिनेता सुबोध भावेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

सुबोध भावेची इन्स्टाग्राम पोस्ट

“मी पहिल्यांदा पुणे ते मुंबई जेव्हा एक्स्प्रेस हायवेनी प्रवास केला तेव्हा मी त्याला नमस्कार करून प्रवासाला सुरवात केली. तो नमस्कार ज्या ज्या व्यक्तींचा तो रस्ता उभारण्यात सहभाग होता त्या सर्व व्यक्तींविषयी कृतज्ञता होती.

आज पुणे मेट्रो च काम पाहताना पुन्हा एकदा हीच भावना मनात आली. अत्यंत गुंतागुंतीच्या भागातून ही मेट्रो प्रवास करणार आहे.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजून सक्षम करण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. चित्रपट पूर्ण होऊन तो पाहताना जेव्हा रसिक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान येतं तेव्हा ती भावना चित्रपटाशी निगडित सर्व व्यक्तींच्या कामाची पावती असते.

काही काळाने जेव्हा पुणे मेट्रो पूर्ण होईल आणि सर्व मार्ग सुरू होतील तेव्हा यातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद “पुणे मेट्रो ” शी निगडित सर्वांच्या कष्टाला दिलेली कौतुकाची पावती असेल. “पुणे मेट्रो” शी संबंधित सर्व घटक- केंद्र सरकार,राज्य सरकार ,पुणे महानगरपालिका, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काम करणाऱ्या हजारो व्यक्ती सर्वांप्रती फक्त कृतज्ञता आणि तुम्हा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.

आपल्या मेट्रो मधून प्रवास करणारे शालेय विद्यार्थी – विद्यार्थिनी ,ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिक अपंग व्यक्ती यांची आपण विशेष काळजी घ्याल ही अपेक्षा…जय हिंद, जय महाराष्ट्र”, असे सुबोध भावेने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुबोध भावेची खास पोस्ट, पत्नीला शुभेच्छा देत म्हणाला…

दरम्यान सुबोध भावेच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट केल्या आहेत. सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमातून तो आपल्याला सूत्रसंचालन करताना दिसत आहे. त्यासोबतच सुबोध हा पहिल्यांदा एका वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. . ‘कालसूत्र’ असे या सीरिजचे नाव आहे. या वेबसिरीजमध्ये तो पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. यात सुबोध भावे आणि सयाजी शिंदे स्क्रीन शेअर करणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor subodh bhave share instagram post talk about pune metro work nrp
First published on: 02-09-2022 at 08:14 IST