scorecardresearch

“… अन् आजही मी त्यावर ठाम” सोनाली कुलकर्णीबद्दल बोलताना अमृता खानविलकरने दिले होते असे उत्तर

“सोना… कुठून सुरुवात करायची गं?”

“… अन् आजही मी त्यावर ठाम” सोनाली कुलकर्णीबद्दल बोलताना अमृता खानविलकरने दिले होते असे उत्तर

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेत्री अमृता खानविलकर या दोघीही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिला सहप्रवाशी म्हणून अमृता खानविलकरचा फोटो दाखवण्यात आला होता. हा फोटो पाहिल्यानंतर तिने अनेक गोष्टींवर भाष्य केले होते. आम्ही एकत्र काम केलं असतं तर नक्कीच मैत्री झाली असती. आमच्यात वैरही नाही, असे सोनालीने स्पष्टपणे सांगितले होते.

सोनाली कुलकर्णीच्या या वक्तव्यानंतर आता सोशल मीडियावर अमृता खानविलकरचा या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. अमृता खानविलकरने ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात सहप्रवाशी म्हणून सोनाली कुलकर्णीशी संवाद साधला होता. त्यावेळी सोनाली कुलकर्णीचा फोटो पाहताच अमृता खळखळून हसली होती. त्यानंतर अमृता म्हणाली होती की, ‘जेव्हा ती येईल तेव्हा तुम्ही माझा फोटो द्याल, असं वचन द्यायला हवं.’ त्यावर सुबोध भावे ‘देऊ, आम्हाला काहीही अडचण नाही’ असं म्हणाला.
आणखी वाचा : “आमच्यात वैर…” अमृता खानविलकरचा फोटो पाहताच सोनाली कुलकर्णी स्पष्टच बोलली

त्यापुढे ती म्हणाली, ‘अनेकांना हे माहिती नाही पण मी तिला सोना असंच म्हणते. तुम्ही नि:शब्द करुन टाकलंय मला हा फोटो दाखवून.’ त्यावर सुबोधने “तिला दोन प्रवासी काहीही न बोलता झोपूनही जाऊ शकतात. बोललंच पाहिजे असं काहीही नाही”, असे सांगितले. पण तिने सोनालीशी फार छान संवाद साधला.

अमृता खानविलकरने सोनाली कुलकर्णीशी साधलेला संवाद

सोना… कुठून सुरुवात करायची गं? हे फार विनोदी आहे ना की तुझा आणि माझा प्रवास खूप एकत्रच सुरु झाला. तू देखील तितकेच उतार चढाव पाहिलेत जितके मी पाहिलेत. सर्वात आधी तुझे अभिनंदन मी तुझ्या लग्नाचे, हनिमूनचे फोटो मी बघितले आणि फार कडक दिसत होतीस तू… आणि काय सांगू तुला?? एकदा बॅकस्टेज तू आणि मी आपण भेटलो होतो तेव्हा तू मला सांगितलं होतंस की आजही लोकांना तुला आणि मलाच एकत्र बघायचं अमृता….आणि त्या गोष्टीवर मी आजही ठाम आहे.

मला या गोष्टीचा फार आनंद आहे की तिही माझ्यासारखी जिद्दी आहे, मेहनती आहे. कधीतरी ती पुढे, मी मागे, तर कधी मी पुढे, ती मागे…असं आमचं सतत सुरु असतं. पण मला फार आनंद आहे की मी तिच्यासारख्या अतिशय सक्षम अभिनेत्रीबरोबर माझं वन ऑन वन सुरु असतं. आता जर ती इथे असती तर तिचं यावर फार वेगळं म्हणणं असतं. एक गंमतीशीर गोष्ट आहे की सोनाला माहिती असतं की मी काय बोलणार आहे आणि मला माहिती असते की ती काय बोलणार आहे. तुम्ही पाहाल तर आम्ही मैत्रीणीही आहोत आणि नाही देखील, असे अमृता खानविलकरने म्हटले होते.

आणखी वाचा : “मी आणि सिद्धार्थ जाधव १० वर्षे एकमेकांशी बोलत नव्हतो आणि श्रीदेवींच्या निधनानंतर…” सोनाली कुलकर्णीने सांगितला किस्सा

त्यावर सुबोध भावेने तिला फार सुंदर शब्दात प्रतिक्रिया दिली होती. मला खरंच तुझं कौतुक वाटतं की तू तिच्याशी मनाचा मोठेपणा दाखवत संवाद साधलास. मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतो, असे सुबोध भावे म्हणाला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress amruta khanvilkar bus bai bus show talk about sonalee kulkarni nrp