scorecardresearch

Premium

“मी आणि सिद्धार्थ जाधव १० वर्षे एकमेकांशी बोलत नव्हतो आणि श्रीदेवींच्या निधनानंतर…” सोनाली कुलकर्णीने सांगितला किस्सा

“तू आणि सिद्धार्थ जाधव एकमेकांचं चेहराही बघत नाही.”

sonalee kulkarni siddharth jadhav

मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. नुकतंच सोनाली कुलकर्णी ही झी मराठी वरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यात तिने सिनेसृष्टीतील विविध विषयांबद्दल भाष्य केले. यावेळी तिने ती आणि सिद्धार्थ जाधव जवळपास १० ते १२ वर्षे एकमेकांशी बोलत नव्हते याबद्दलचा खुलासाही केला. तसेच त्यांच्यात पुन्हा कशाप्रकारे मैत्री झाली याबद्दलही तिने सांगितले.

‘बस बाई बस’ या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या अनेक कलाकारांना विविध प्रश्न विचारले जातात. त्यावर त्यांना उत्तर द्यावी लागतात. या कार्यक्रमादरम्यान सुबोध भावेने सोनालीला तुझे कधी सहकलाकारासोबत भांडण झाले आहे का? असा प्रश्न विचाराला होता. त्यावर तिने हो असे उत्तर दिले. त्यावर सुबोध भावेने नाव विचारताच सोनालीने पटकन सिद्धार्थ जाधव असे म्हटले. यासोबत तिने एक किस्साही सांगितले.
आणखी वाचा : “आमच्यात वैर…” अमृता खानविलकरचा फोटो पाहताच सोनाली कुलकर्णी स्पष्टच बोलली

birth anniversary of bhagat singh
Shaheed Bhagat Singh’s birth anniversary: पंडित नेहरू यांनी भगतसिंग यांचे समर्थन का आणि कसे केले?
kavita lad
“माझी हळद, मेहंदी सारखे कार्यक्रम…” कविता लाड यांनी सांगितली खऱ्या आयुष्यातील त्यांच्या लग्नाची खास आठवण
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”
Vivek agnihotri reply naseeruddin shah
“त्यांचं दहशतवाद्यांवर प्रेम…” नसीरुद्दीन शाहांच्या ‘त्या’ टीकेनंतर विवेक अग्निहोत्रींचं प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांच्या धर्मामुळे…”

सोनाली कुलकर्णी नेमकं काय म्हणाली?

“सिद्धार्थ जाधव आणि मी सतत भांडत असतो. एकदा आम्ही इरादा पक्का चित्रपटाचे शूट करत होतो. त्यावेळी आम्ही एकमेकांशी काहीही बोलतच नव्हतो. आमचे कास्टिंग झाले, त्यानंतर आमचं भांडण झालं. क्षणभर विश्रांती नंतर आमचं इरादा पक्का चित्रपटाचं शूटिंग होणार होतं. त्याआधी मला केदार जाधव यांनी फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं सॉरी आम्ही वेगळी मुलगी शोधतोय. त्यावेळी मी केदार जाधव यांना दुसरी मुलगी शोधण्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, तू आणि सिद्धार्थ जाधव एकमेकांचं चेहराही बघत नाही. ही रोमँटिक जोडप्याची गोष्ट आहे, मग हे शूट कसं होणार आहे? त्यावेळी मी त्यांना विचारलं, तुम्ही मला का काढत आहात, सिद्धार्थ जाधवला तुम्ही नाही काढणार…, तो तुमचा लाडका ना असे बोलून ओके सांगत फोन ठेवला होता.

त्यानंतर पंधरा-वीस दिवसांनी त्यांनी मला पुन्हा फोन केला आणि हे काम तुलाच करावा लागणार आहे. त्या भूमिकेसाठी दुसरी मुलगी अद्याप सापडत नाही असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर चित्रपटाच्या शूटींगवेळी सिद्धार्थ जाधव हा केदार जाधव यांच्यासोबत वेगळी तालीम करायचा आणि मी त्यांच्यासोबत वेगळी तालीम करायचे. मी आणि सिद्धार्थ फक्त त्या चित्रपटातील केवळ एका रोलसाठी समोरासमोर उभे राहायचं आणि त्यानंतर पुन्हा आमच्या कामाला लागायचो. जवळपास आम्ही एकमेकांशी बोलतच नव्हतो. आम्ही जवळपास दहा वर्ष एकमेकांशी एक शब्दही बोललो नाही.

त्यानंतर एकदा अचानक प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं. त्यावेळी अचानक सिद्धार्थ जाधवचा मला फोन आला आणि तो म्हणाला, आपलं आयुष्य हे किती क्षणभंगूर आहे. कधी, कुठे, केव्हा काय होईल, हे माहिती नाही. असंच अचानक कधीतरी मी गेलो किंवा तू गेलीस तर जो उरलेला असेल त्याला कायम आयुष्यभर या गोष्टींचा दोष असल्यासारखे वाटले आणि मला असे होऊ द्यायचे नाही. त्यामुळे सॉरी मी गेली दहा वर्ष तुझ्याशी बोललो नाही याची मला खंत वाटते.

मी माझ्या मैत्रिणीला गेली दहा वर्ष खूप मिस केलं आणि काय झालं असेल त्यासाठी मी सॉरी बोलतो आपण पुन्हा बोलूया का? मग आम्ही भेटलो बोललो आणि आता आम्ही एकमेकांशी बोलतो पण आम्ही अजूनही तितकेच भांडण करतो”, असे सोनाली कुलकर्णीने म्हटले.

आणखी वाचा : सोनाली कुलकर्णी मालदिवमध्ये राहत असलेल्या रिसॉर्टचे एक दिवसाचे भाडे माहितेय का?

दरम्यान सोनाली कुलकर्णीचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. यावेळी तिला अमृता खानविलकरचा फोटो दाखवण्यात आला. त्यावर सोनालीने स्पष्टपणे भाष्य केले आहे. त्यावेळी तिने आपली मैत्री कधीच झाली नाही. कारण आपण कधीच एकत्र काम केलं नाही, असे म्हणाली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress sonalee kulkarni share interesting story talk about siddharth jadhav dispute nrp

First published on: 19-09-2022 at 13:20 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×