मराठीतील सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते. उत्तम अभिनय, कमालीचा डान्स आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री म्हणून तिची खास ओळख आहे. मराठी सिनेसृष्टीत अमृताचं नाव जितकं चर्चेत असतं तितकीच तिच्या नावाची चर्चा बॉलिवूडमध्येही असते. अमृताने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मालिका, वेबसीरीजमध्ये काम केले आहे. अमृता खानविलकरची प्रमुख भूमिका असलेला चंद्रमुखी हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केले.

अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध पोस्ट शेअर करताना दिसते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत तिने त्याला छान कॅप्शनही दिले आहेत. सध्या तिचे हे कॅप्शन चर्चेचा विषय ठरत आहे.

उद्धव ठाकरे कमी पडले की देवेंद्र फडणवीस भारी पडले? सुप्रिया सुळे म्हणतात “दिल्लीवाल्यांची यंत्रणा…”

झी मराठी वाहिनीवरील बस बाई बस या कार्यक्रमात अमृता ही सहभागी झाली होती. त्याचा एक प्रोमो व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. “मला भाकरी येते का चपाती ? मी घाबरट आहे का बिनधास्त ? मी पुण्याची का मुंबईची ? असे खूप प्रश्न आणि त्यांची उत्तरं घेऊन मी बसले ह्या आगळ्या वेगळ्या बस मध्ये माझा हा प्रवास आणि “माझा” प्रवास बघायला विसरू नका”, असे तिने या व्हिडीओला कॅप्शन देताना म्हटले आहे.

बस बाई बस : “…तर माझ्या त्यांना शुभेच्छा”, सुप्रिया सुळेंचा शिंदे-फडणवीस सरकारला अप्रत्यक्ष टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कार्यक्रमात तिला तू अजिबात घाबरत नाहीस का? असा प्रश्न तिला विचारला होता. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “मी खूप घाबरते. मी एकटी कोणत्याही हॉटेलच्या रुममध्ये झोपते तेव्हा त्या रुमचे सर्व लाईट्स चालू करुन झोपते. जिथून उजेड येतो तेवढा तो येऊन देते.” दरम्यान तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या या पोस्टखाली आणि व्हिडीओवर अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत.