अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी धुमाळ हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. हेमांगी अनेकदा सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. हेमांगी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती नेहमी तिचे अनेक फोटो आणि धमाल व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. नुकतंच हेमांगी कवी हिने फेसबुकवर भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे.

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली होती. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर अनेक मराठी कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. लता मंगेशकर यांचे निधन होऊन आज एक महिना उलटला आहे. या निमित्ताने हेमांगी धुमाळ हिने एक पोस्ट शेअर केली आहे.

हेमांगी कवीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक चाफ्याची फुले असलेला फोटो पोस्ट केला आहे. याला तिने हटके कॅप्शनही दिले आहे. “आज एक महिना झाला! भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पायावरील वाहिलेल्या या सोनचाफ्याला! त्यांचा आशीर्वाद म्हणून उचलून घेतलं आणि जपून ठेवलं! कायम जपणार! माझ्याकडे असलेली सर्वात महाग वस्तू!” असे हटके कॅप्शन तिने दिले आहे.

तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. तिच्या या पोस्टवर एका नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. ‘ठेवू नका. जाळा अथवा फेकून द्या. मृतात्म्यासंबंधित कोणतीच गोष्ट घरी आणू नये’, असे त्या नेटकऱ्याने म्हटले आहे. यावर कमेंट करताना हेमांगी कवी म्हणाली, ‘मी खरंच अश्या गोष्टी मानत नाही! म्हणून तुमचं म्हणणं थोतांड होत नाही. तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात मी माझ्या. आता हे आशीर्वाद म्हणून उचलून घेतलेलं फुल ही काही लोकांसाठी थोतांड होऊ शकतं. पण माझ्यासाठी ते अनमोल आहे.’

“आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही”, अभिनेत्री हेमांगी कवीची पोस्ट व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान हेमांगी कवी ही सध्या ‘कलर्स मराठी’वरील ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेच्या मुख्य भूमिकेत झळकत आहे. तिच्यासोबत सुशील इनामदारही मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. ‘लेक माझी दुर्गा’ ही मालिका एका हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचे सांगितले जाते. कलर्स या हिंदी वाहिनीवर शक्ती अस्तित्व एक एहसास की ही मालिका प्रसारित केली जात होती. गेल्या काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. ‘लेक माझी दुर्गा’ ही मालिका ‘शक्ती अस्तित्व एक एहसास की’ या मालिकेचा रिमेक आहे.