मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरण आणि बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानची अटक हे प्रकरण काही महिन्यांपूर्वी चांगलेच चर्चेत आले होते. या अटकेदरम्यान चर्चेत आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. समीर वानखेडे यांना त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्र प्रकरणात क्लीनचिट मिळाली आहे. आर्यन खानच्या अटकेनंतर हे प्रकरण चिघळलं होतं आणि त्यानंतर त्याला वेगळंच राजकीय वळण मिळालं होतं. दरम्यान समीर वानखेडेंना क्लीनचिट मिळाल्यानंतर त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने एक पोस्ट शेअर केली आहे. तिचीही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
“मी पत्र लिहिलंय, कारण मला फक्त…”; क्रांती रेडकरची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद

अभिनेत्री क्रांती रेडकर ही कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच क्रांतीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका न्यूज चॅनलचा आहे. या व्हिडीओत समीर वानखेडेंना क्लीन चीट दिल्याची बातमी सांगितली जात आहे. याला तिने हटके कॅप्शनही दिले आहे.

Saima ubaid First female powerlifter from Kashmir
सायमा ओबेद… कश्मिरमधील पहिली महिला पॉवरलिफ्टर
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?
sex change operation indore man
लिंगबदल शस्त्रक्रिया करून मुलाची मुलगी झाला; ४५ लाख खर्च केल्यानंतर प्रियकराकडून लग्नासाठी नकार
Alexei Navalny Death
अलेक्सी नवाल्नींची शक्ती अन् प्रेरणास्थान राहिलीय ‘युलिया; पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची पहिली पोस्ट चर्चेत

“आर्यन खान भ्रष्टाचार प्रकरणात आधी क्लीन चिट आणि आता हे !!! सत्याचा नेहमी विजय होतो! सत्यमेव जयते, जयहिंद!” असे क्रांतीने रेडकरने व्हिडीओ कॅप्शन देता म्हटले आहे. तिच्या या इन्स्टाग्राम पोस्टवर अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी यावर कमेंट करत टाळ्या वाजवतानाचे इमोजी शेअर केले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

दरम्यान आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीने क्लीनचिट दिली आहे. धर्म लपवून एका मागासवर्गीयाचा अधिकार हिसकावून घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या आरोपाप्रकरणी तपास केल्यानंतर जात पडताळणी समितीने समीर वानखेडे हे जन्मत: मुस्लीम नसल्याचे म्हणत त्यांना क्लीनचिट दिली.

“आज बाळासाहेब असते तर…,” क्रांती रेडकरचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

याप्रकरणी जात पडताळणी समितीनी ९१ पानांचे आदेशपत्र काढले आहे. समितीने समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्रदेखील कायम ठेवले आहे. समीर वानखेडे तसेच त्यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लीम धर्म स्वीकारला नसल्याचेदेखील म्हणत ते अनुसूचित जाती (महार-३७) प्रवर्गातील असल्याचे या समितीने सांगितले आहे. दरम्यान, जात पडताळणी समितीने काढलेल्या या निष्कर्षानंतर समीर वानखेडे यांनी एक ट्वीट करून सत्यमेव जयते अशी सूचक प्रतिक्रिया दिली होती.