आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे तिला वेगळी ओळख मिळाली. यामुळे मानसी नाईक हे नाव घराघरात पोहोचलं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मानसी ही तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा घटस्फोट घेणार आहेत. यासाठी तिने अर्जही दिला आहे. यावरुन तिला अनेकांनी ट्रोल केले. त्यावर तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

मानसी नाईक ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असते. काही आठवड्यांपूर्वी मानसीने  ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत मानसी नाईकने घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. “माझ्या घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दुःखी आहे.” असे तिने म्हटले होते.
आणखी वाचा : “एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण

त्यानंतर मानसीला ट्रोलर्सचा सामना करावा लागला. आता तिने या ट्रोलर्सवर भाष्य करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. मानसीने इन्सटाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

“हा मेसेज मला ट्रोल करणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. तुमच्यासाठी मी लवकरच काही चांगल्या चांगल्या मेसेजेसचे स्क्रीनशॉट शेअर करणार आहे. त्यावरुन तुम्हाला कळेल की कशाप्रकारे लोक मुलींना थेट मेसेज करुन त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची विचारपूस करतात. यात सर्वात हसण्याची बाब म्हणजे त्या मुलींनीच मला याचे स्क्रीनशॉट पाठवले आहेत. तोपर्यंत तुम्ही छान अवकाशाची मज्जा घ्या. पण आता तुम्हाला लवकरच अंदाज येईल की या गोष्टी का होत आहेत? जगापासून काहीही लपून राहत नाही. तुम्हीही नाही”, असे तिने यात म्हटले आहे.

मानसी नाईकची कमेंट

आणखी वाचा- “त्यांनी मित्राचा बुरखा पांघरला आणि…” घटस्फोटाच्या चर्चांवर मानसी नाईकने पहिल्यांदाच सोडलं मौन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मानसी नाईकची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिने तिच्या या पोस्टमध्ये प्रदीपचा उल्लेख केलेला नाही. मात्र तिने यात अप्रत्यक्षरित्या त्याला टोला लगावला आहे. तिची ही स्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आहे.