आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे ती घराघरात पोहोचली. नुकतेच तिचे हिंदी अल्बममधील एक गाणे सध्या चर्चेत आहे. या गाण्याचे नाव ‘दिल टूटा हैं तो क्या ‘असून ते आता यूट्यूबवरदेखील प्रदर्शित झालं आहे. हे गाणे स्वरूप भालवणकर यांनी संगीतबद्ध आणि गायले आहे. याच गाण्यावर तिने भाष्य केलं आहे.

मानसी नाईक ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तसेच साधय ती तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी मानसीने पती प्रदीप खरेरापासून विभक्त होणार असल्याचं जाहिर केलं. फ्री प्रेस जर्नलशी बोलताना ती असं म्हणाली “माझा पहिला व्हिडिओ अल्बम आहे, मात्र हे गाणे माझ्या वास्तविक जीवनातून प्रेरित नव्हते.”

“तुमचे आशीर्वाद…” मानसी नाईक लवकरच करणार नवी सुरुवात, पोस्ट चर्चेत

ती पुढे म्हणाली, “हे गाणं एक सकारात्मक दृष्टीकोन देणारं आहे. तसेच हा दृष्टिकोन माझ्या खऱ्या आयुष्यातदेखील आहे. ‘मेरा दिल टूटा हैं हे’ गाणे हार मानत नाही.” नुकतंच मानसी नाईकने तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. मानसी नाईक ही लवकरच हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. तिने तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानसी नाईकच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे नाव ‘सिफर’ असे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन विनोद वैद्य यांनी केले आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.