‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ यांसारख्या गाण्यांमधून चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. मानसी नाईक ही लवकरच घटस्फोट घेणार आहे. मानसी नाईक ही तिचा पती प्रदीप खरेरा याच्यापासून वेगळी होणार आहे. काही महिन्यांपूर्वी तिने घटस्फोटासाठी अर्जही दिला आहे. त्यामुळे ती सातत्याने चर्चेत आहे. त्यातच मानसीने आता इन्स्टाग्रामवर रिल व्हिडीओ बनवणाऱ्या एका महिलेला चांगलंचं सुनावलं आहे.

मानसी नाईकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तिला ट्रोल केले होते. यात दीपिका नावाच्या एका इन्स्टाग्राम इन्फ्लुअन्सरने तिच्या व्हिडीओखाली ‘फालतू’ अशी कमेंट केली. तिची ही कमेंट वाचल्यानंतर मानसीला राग अनावर आला. त्या कमेंटखाली मानसीने प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा- “त्यांनी मित्राचा बुरखा पांघरला आणि…” घटस्फोटाच्या चर्चांवर मानसी नाईकने पहिल्यांदाच सोडलं मौन

“ही महिला माझ्या प्रत्येक इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करताना दिसते. जरा तरी शहाण्यासारखी वाग. अन्यथा मी तुझा पत्ता शोधून काढेन आणि पोलिसात तुझ्याविरोधात तक्रार करेन. तू चांगल्या घरातली वाटतेस. त्यामुळे माझ्या नावाचा वापर करु नकोस, सावध राहा”, असे मानसी नाईक म्हणाली.

त्यावर त्या महिलेनेही प्रत्युत्तर दिले आहे. “मानसी तुला हवं ते तू कर. मला पर्वा नाही. मला जर काही आवडलं नाही तर मला त्यावर कमेंट करण्याचा अधिकार आहे. तू प्रदीपबरोबर लग्न केलंस तेव्हा खूप बरं वाटलं होतं, पण घटस्फोट घेतेस हे समजल्यावर मला अजिबात ते आवडलं नाही. ही माझी जाहीररित्या नाराजी आहे”, असे तिने म्हटले.

त्यावर मानसी म्हणाली, “तू देखील माझ्याप्रमाणे CatMom आहेस. त्यामुळे नियंत्रणात राहा. तू व्हिडीओ बनवतेस ना, मग त्यात तुझ्या ऊर्जेचा वापर कर. काही तरी चांगल्या गोष्टी कर जेणेकरुन तुला पुढे जाण्यास मदत होईल. पण जर तुला मला ट्रोल करण्यासाठी पैसे मिळत असतील तर मी तुझ्या त्या कमेंट तशाच ठेवून तुला आणखी मदत करु शकते.”  

आणखी वाचा : चट मंगनी पट ब्याह! …अन् अवघ्या पावणे दोन वर्षात मोडणार मानसी नाईकचा संसार

त्यावर तिने उत्तर देत म्हटले की, “तुला ट्रोल करण्यासाठी मला कोणीही पैसे वैगरे देत नाही. तू माझी शत्रू नाहीस. मला तुझ्या भूतकाळातील काही गोष्टी आवडलेल्या नाही. ज्यामुळे मला तुझा राग आलाय. पण आता भूतकाळ महत्त्वाचा नाही. जेव्हा तू लग्न केलंस तेव्हा मला खूप आनंद झाला होता. प्रदीप चांगला मुलगा होता. पण तू त्याला सोडल्यानंतर तुझ्याबद्दल अनेकांच्या मनात पुन्हा तेच विचार आले. मला माफ कर.. पण हेच सत्य आहे”, असे तिने म्हटले.

“मी तुझा नक्कीच आदर करते, पण एखादी गोष्ट पूर्ण माहिती नसेल तर त्याबद्दल मत ठरवू नका. मला हवं असेल तर मी तुमच्याशी तुमच्या कमेंटनुसार वागू शकते. पण तुम्ही आणि तुमच्या सारख्या असंख्य लोकांनी हे समजून घ्यायला हवं…. तुमच्या कल्पनेपेक्षा वास्तविकता सर्वात वाईट असते. जर तुम्ही मला कलाकार म्हणून वागवले तर मी मला वाईट वाटेल कारण मी प्रसिद्ध आहे… पण तुम्ही माझ्याकडे चांगल्या पार्श्वभूमीची एक साधी मुलगी म्हणून पाहण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला कदाचित कल्पना येईल! हे माझे वैयक्तिक आयुष्य आहे आणि मी एका वाईट संकटातून वाचले आहे. देव करो तुझ्याबरोबर किंवा कधीच इतर कुणाबरोबर असे होऊ नये. लग्न हे पवित्र असते आणि मी पहिल्या दिवसापासूनच त्याचा आदर करत होती आणि त्याबद्दल नेहमीच आदर राहिलं”, असे मानसी नाईक म्हणाली.

आणखी वाचा : “एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण

त्यावर ती महिला म्हणाली, हा सर्व प्रकार याआधी माझ्याबरोबरही घडला आहे. तो तुझ्याबरोबर घडू नये, असे मला वाटायचं. पण जाऊ दे. उगाच लोकांना तमाशा दाखवण्यात काहीही अर्थ नाही. जर तुला बोलायचं असेल तर पर्सनलवर चॅट करु. नाहीतर जाऊ देत. तुझ्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलण्याचा मला काहीही अधिकार नाही. पण एवढंच वाटतंय की तू घटस्फोट घ्यायला नको होता…. आणि हो काही गोष्टी माझ्या भूतकाळाशी संबंधित आहे. त्यामुळे मला थोडा राग आहे. ते आत्ता महत्त्वाचं नाही. पण तुझ्याबद्दल माझं मत तेच कायम राहिल आणि रागही…

“साहजिकच मी तुला वैयक्तिकरित्या ओळखत नाही. पण तू एक CatMom आहेस म्हणून तुला प्रतिक्रिया दिली. पण तुझे उत्तर वाचून मला समजले की तुला बरं होण्याची फार आवश्यकता आहे. तुझ्याकडे द्वेष आणि राग आहे. ज्याचा तुला फार त्रास होत आहे. यामुळेच कदाचित तुला पुढे जाता येत नाही. पण तू ते सोडून द्यायला हवं. एक कलाकार म्हणून माझे काम फक्त मनोरंजन करणेच नव्हे तर समाजाचा एक भाग म्हणून आजूबाजूच्या लोकांना मदत करणे हे देखील आहे. ते मी माझे कर्तव्य समजते. आपण प्रथम स्वत: चा आदर करणे आवश्यक आहे. त्यानंतरच आपण इतरांचा आदर करण्यास सुरुवात करु शकतो. तुझ्यासारख्या मुलीला देव आणखी बळ देवो”, असे मानसी नाईक म्हणाली.

आणखी वाचा : “तिला कंट्रोल…” दीपाली सय्यद यांनी मानसी नाईक-प्रदीपच्या लग्नाबद्दल केलेला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
manasi naik troller reply 3 (1)
मानसी नाईकने ट्रोल करणारीला सुनावले

दरम्यान मानसी नाईक आणि त्या महिल्या नेटकऱ्यामध्ये रंगलेला हा वाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याचे अनेक फोटोही सध्या व्हायरल होताना दिसत आहे. मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. पण त्यानंतर त्या दोघांनीही इन्स्टाग्रामवरून एकमेकांबरोबरचे फोटो डिलीट केले होते. त्यामुळे दोघांच्याही नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.