गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मानसी नाईकच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचं बोललं जात होतं. त्यातच ती सोशल मीडियावर विविध पोस्ट करताना दिसत आहे. त्यातच आता मानसी नाईकने तिच्या नात्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

मानसी नाईक ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती कायमच इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी गाण्याबद्दल, चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर करताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या खासगी आयुष्याशी निगडीत पोस्ट करताना दिसत आहे. यातील बहुतांश पोस्ट या इमोशनल आहेत. त्यातच तिने तिच्या पतीबरोबरचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवरुन डिलीट केले आहेत. त्यानंतर त्या दोघांच्या आयुष्यात काहीही ठिक नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या चर्चांना मानसी नाईक किंवा प्रदीपने कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नव्हते.
आणखी वाचा : “डोळ्यामध्ये पाणी होते…” मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

त्यातच आज तिने तिच्या पतीच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तिने शेअर केलेली ही स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यात तिने अप्रत्यक्षरित्या प्रदीप आणि तिच्या नात्याबद्दल भाष्य केले आहे.

“आज मी माझ्या मोबाईलमधल्या काही गोष्टी डिलीट करत होते, तेव्हा प्रत्येक वेळी फोन मला विचारत होता Are You Sure म्हणजे नक्की ना….!! मला मोठे आश्चर्य वाटले की एक निर्जीव मशीन आपल्या आत साठवलेल्या आठवणी काढून टाकण्यापूर्वी तुम्हाला नक्की ना असं विचारते. मग एक जिवंत माणूस ज्याला भावना आहेत, असे म्हटले जाते. इतका निष्काळजी व भावनाशून्य कसा राहतो. जो नातेसंबंध तोडण्यापूर्वी वा तोंड फिरवण्यापूर्वी स्वत:ला एकदाही विचारत नाही की Are You Sure म्हणजे नक्की ना !”, असे तिने या स्टोरीमध्ये म्हटले आहे.

manasi naik
मानसी नाईक

आणखी वाचा : “आयुष्य बेरंग…” घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मानसीने शेअर केलेली ही स्टोरी सध्या चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. अनेक चाहत्यांना तिची ही स्टोरी वाचून धक्का बसला आहे. तिने शेअर केलेल्या या इन्स्टाग्राम स्टोरीचे तिच्या खासगी आयुष्याशी काही संबंध आहे का? याबद्दल चर्चा सुरु आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. पण आता दोघांनीही इन्स्टाग्रामवरून त्यांनी एकमेकांबरोबरचे फोटो डिलिट केले आहेत. त्यामुळे दोघांच्याही नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.