‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ असे म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अतरंगी कुटुंबातील एक कलाकार नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. नकटीच्या भावाची विनोदी भूमिका साकारणारा अभिनय सावंत पूर्वा पंडित हिच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकला आहे. मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि टेलिव्हिजन विश्वात आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या निर्मिती सावंत यांचा अभिनय मुलगा आहे.
आपल्या आईप्रमाणेच त्यानेही या कलाविश्वातच करिअर करण्याचा निर्णय घेतला असून, सध्या तो अगदी योग्य वाटेवर चालत असल्याचे पाहायला मिळतेय. काही दिवसांपूर्वीच साखरपुडा केल्यानंतर अभिनयने त्याच्या आणि पूर्वाच्या नात्याला एक नवे नाव दिले. अभिनय आणि पूर्वा जवळपास १२ वर्षांपासून एकत्र आहेत. पूर्वासुद्धा अभिनेत्री असून ती रंगभूमीवर सक्रिय आहे. पूर्वा आणि अभिनयच्या या नव्या नात्यामुळे निर्मिती सावंत यांच्या कुटुंबात आणखी एका कलाकाराची भर पडली असे म्हणायला हरकत नाही.
वाचा : अनुष्कासाठी तीन महिने शोधत होता अंगठी
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अभिनया आणि पूर्वाच्या लग्नातील एक फोटो पोस्ट केला आहे. ‘आज मेरे भाई की शादी है…’ असे कॅप्शन देत प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये पूर्वा आणि अभिनय लग्नविधींसाठी बसलेले दिसत असून, ते अगदी पारंपरिक मराठमोळ्या वेशात दिसत आहेत. प्राजक्ताही या फोटोमध्ये सुरेख दिसत असून, तिच्या नाकातील हलकासा मॉडर्न टच असणारी नथ अनेकांचेच लक्ष वेधते आहे.
वाचा : विराटआधीही हे क्रिकेटर होते अभिनेत्रींच्या प्रेमात
View this post on InstagramThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.