मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट. ती सध्या यशाच्या शिखरावर आहे. उत्तम अभिनयसोबतच प्रिया तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती कायम फिटनेसला महत्व देताना दिसते. ती तिच्या इन्स्टग्रामवर फिटनेस संबंधित फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
प्रियाने नुकताच एक इन्स्टाग्रामवर फिटनेसचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ती काळ्या रंगाचे कपडे घालून हेवी वर्कआऊट करताना दिसत आहे. या व्हिडीओत ती वजन घेऊन स्काॅट मारताना दिसत आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. तसंच लाईक्सचा वर्षाव देखील करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
याआधी देखील प्रियाने वर्कआउट संबंधित व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे. “चांगला वर्कआऊट केला तर तुमचा मूड पण चांगला राहतो” असे कॅप्शन देत तिने नेटकऱ्यांना सल्ला दिला आहे. तसंच तिने लॉकडाउन वर्कआऊटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. इतकंच नव्हे, तर फिट राहण्यासाठी ती चक्क तिच्या इमारतीचे आठ मजले चढ-उतार करायची. तिने तिच्या लॉकडाउन वर्कआऊट बद्दल बोलताना सांगितले होते की, “आठ मजले सात वेळा चढले आणि उतरले”. पण त्याबरोबरच तिने, इतरांना हे ही लगेचच सांगितले की योग्य मार्गदर्शन घेऊनच अशा प्रकारचं वर्कआऊट करावं.
तिच्या कामा बाबत बोलायचे झाले तर तिच्या हॉटस्टारवरील ‘सिटी ऑफ ड्रिम्स ‘या मालिकेचा दुसरा भाग आत्ताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या बरोबरच ती आणि तिचा पती अभिनेता उमेश कामत ‘आणि काय हवं?’या सीरिजचा तिसरा सिझन देखील प्रदर्शित झाला आहे. तिच्या दोन्ही वेब सीरिजवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहेत.