अभिनेत्री प्रिया बापट ही एक गुणी आणि विविध मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून काम करणारी अभिनेत्री आहे. प्रिया बापटचे विविध चित्रपट, मालिका, वेब सीरिज हे प्रेक्षकांना आवडतात. सिटी ऑफ ड्रीम्समध्ये तिने साकारलेली ‘पौर्णिमा गायकवाड’ ही भूमिकाही लोकांच्या स्मरणात आहे. तसंच ‘जर तरची गोष्ट’ या तिच्या आणि उमेश कामतच्या नाटकालाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सध्या प्रिया बापट तिचा नवरा आणि अभिनेता उमेश कामतसह सुट्टी एंजॉय करते आहे. त्या सुट्टीतले बिकिनीवरचे फोटो पोस्ट करणं मात्र प्रियाला महागात पडलं आहे. कारण या फोटोंसाठी तिला ट्रोल केलं जातं आहे.

काय आहे प्रिया बापटची पोस्ट?

Here’s to more ‘first times’ and owning every inch of me! One more thing off the ‘I-did-it’ list! हे वाक्य लिहून प्रियाने तिचे बिकिनीवरचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये प्रिया ही समुद्र किनाऱ्यावर आहे आणि छान हसताना दिसते आहे. इंस्टाग्रामवर तिने केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. या फोटोंमध्ये प्रिया बापट कमालीची हॉट दिसते आहे. मात्र या दोन फोटोंवरुन आणि कॅप्शनवरुन तिला अनेक युजर्सनही ट्रोल केलं आहे.

काय म्हटलं आहे युजर्सनी?

“यातून नेमके काय साध्य करायचे आहे? इस्रायलमधल्या बळी पडलेल्या निष्पाप महिलांना विचारा, की प्रत्येक इंचाचा अर्थ आणि महत्व काय असते ते. स्वतःच्या शरीराचा अभिमान असावा पण अतिरेक नको. शरीर सौष्ठव स्पर्धेत पण अंग दाखवतात…पण एखादा हायलाईट करणं..” असं म्हणत एका युजरने कमेंट केली आहे.

आणखी एक युजर म्हणतो, “बाहेरील देशात गेलं की स्वतःच्या संस्कृतीला विसरूनच जातात लोक. मुळात बाहेर गेलं की बिकिनी शूट करणं हा काय प्रकार आहे? बरं चला केलं तर केलं लोकांना का दाखवता?”

“प्रियाताई तुझी एक वेगळीच ओळख आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये तुला हे दाखवण्याची खरंच गरज नाही. मुक्ता बर्वेसारख्या मोठ्या कलाकारांसह तुझे नाव आदराने घेतले जाते. पण तू आत्ता सई ताम्हणकरच्या यादीत स्वतःला टाकत आहेस आणि हे तुझ्या साठी योग्य नाही… तू एक छान कलाकार आहेस.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“बाहेर जाऊन असेच फोटो काढल्या शिवाय पिकनिक पूर्ण होत नाही वाटतं ,पण आपल्या मराठी अभिनेत्रींकडून हे अपेक्षित नव्हतं” अशाही दोन कमेंट दोन वेगवेगळ्या युझर्सनी केल्या आहेत. अशा कमेंट करत प्रियाला ट्रोल करण्यात आलं आहे. प्रिया बापटच्या या पोस्टवर शेकडो कमेंट्स पडल्या आहेत. काही युझर्सनी तिचं समर्थनही केलं आहे.