मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे शंतनू मोघे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. सध्या तो ‘सफरचंद’ नाटकात झळकताना दिसत आहे. यानिमित्ताने त्याची पत्नी आणि अभिनेत्री प्रिया मराठेने पोस्ट शेअर केली आहे.
नुकतंच बोरिवलीच्या एका नाट्यगृहात ‘सफरचंद’ नाटकाचा प्रयोग पार पडला. यावेळी शंतनू मोघेने पायाला दुखापत झालेली असतानाही त्या नाटकाचा प्रयोग केला. यावेळी त्याने हातात वॉकर घेऊन त्याचे पात्र साकारले होते. या प्रयोगाला प्रेक्षकांनीही दाद दिली होती. शंतनू मोघे यांना महानाट्याच्या तालमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना त्यांना दुखापत झाली होती.
आणखी वाचा : “गुन्हेगारांना लवकरच शिक्षा होणार…” व्हायरल अश्लील व्हिडीओप्रकरणी मराठमोळ्या इन्स्टा स्टारच्या नव्या पोस्टने वेधलं लक्ष
याच निमित्ताने प्रिया मराठने शंतनू मोघेचे कौतुक करणारी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. तिने त्याचे काही फोटो आणि व्हिडीओही पोस्ट केले आहेत. तिला तिने हटके कॅप्शनही दिले आहे.
प्रिया मराठेची पोस्ट
“रिअल हिरो!
Hatts off वगैरे अलंकार फार छोटे वाटत आहेत.
हे तूच करू जाणे..
तुला आणि तुझ्यातल्या कलाकाराला सलाम!
ज्यांना कल्पना नाही त्यांना सांगू इच्छिते.. पाय फ्रॅक्चर झालेला असताना, वॉकर घेऊन, ठरलेला प्रयोग अतिशय उत्तम प्रकारे करून शांतनू नी खरंच अभूतपूर्व उदाहरण आपल्या समोर ठेवलं आहे..
कमाल! आता तुला हडाचा कलाकार म्हणता येईल”, असे प्रिया मराठेने म्हटले आहे.
दरम्यान प्रियाच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केली आहे. अभिनेते अमोल कोल्हे यांनी या पोस्टवर कमेंट करत शंतनू मोघेचे कौतुक केले आहे. तसेच ‘तू लवकर बरा हो’, असेही त्यांनी म्हटले आहे. तर अभिजीत खांडकेकरने ‘खरंच कौतुकास्पद’ अशी कमेंट केली आहे.