Video : तुम्हाला माहितीये, रिंकू कसा निवडते चित्रपट ?

चित्रपट निवडताना रिंकू करते ‘या’ गोष्टींचा विचार

‘आर्ची आली आर्ची’, असं म्हटल्यानंतर साऱ्यांच्या नजरा जिच्या येण्याकडे वळतात ती अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. कमी वयात कलाविश्वात पदार्पण केलेल्या रिंकूने आज अफाट लोकप्रियता मिळविली आहे. तिची मुख्य भूमिका असलेले ‘सैराट’, ‘कागर’ हे चित्रपट लोकप्रिय ठरले. त्यानंतर आता ती ‘मेकअप’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटामध्ये ती पहिल्यांदाच एक वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

कमी वयात यशाचं शिखर सर करणारी रिंकू आता कलाविश्वामध्ये रमू लागली आहे. त्याचप्रमाणे ती चित्रपटांची निवड करतानाही बराच विचार करते. चित्रपटांची निवड करताना ती नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार करते हे तिने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

वाचा : Video : सेलिब्रिटी झाल्यानंतर रिंकूला वाटते ‘या’ गोष्टीची खंत

रिंकूचा ‘मेकअप’ हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता चिन्मय उदगीरकर स्क्रीन शेअर करत आहे. तर चित्रपटाचं दिग्दर्शन गणेश पंडित यांनी केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi actress rinku rajguru movie selection ssj

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या