मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सायली संजीवला ओळखले जाते. गेल्या काही वर्षांपासून ती क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडला डेट करत असल्याचे बोललं जातं आहे. ऋतुराज गायकवाड आणि सायली संजीव हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चाही कायम सुरु असतात. मात्र आता सायलीने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सायलीने एका मुलाखतीत याबद्दल भाष्य केले आहे. सायली आणि ऋतुराजच्या अफेअरच्या चर्चा गेल्या आयपीएलपासून रंगल्या आहेत. ऋतुराजने सायलीच्या वनपीस घातलेल्या फोटोवर कमेंट केली होती. त्या कमेंटमुळे या चर्चा सुरु झाल्या होत्या. ऋतुराजने तिच्या त्या फोटोवर वाह अशी कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केले होते. त्यावर सायलीनेही हार्ट इमोजी शेअर करत त्याला रिप्लाय दिला होता. त्यानंतरच त्यांच्या अफेरच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र आता सायलीने ऋतुराज आणि तिच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.आणखी वाचा : “तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य सायली ही सध्या गोष्ट एका पैठणीची या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत सायलीला ऋतुराजबरोबरच्या नात्याबद्दल विचारणा करण्यात आली. मात्र यावेळी सायलीने दिलेल्या उत्तराने सर्वजण चकित झाले. "जेव्हा ऋतुराज आणि माझ्या नात्याबद्दल चर्चा रंगू लागल्या तेव्हा त्याचा आमच्या मैत्रीवर परिणाम झाला. आता आमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. आता आम्ही मित्रासारखं देखील बोलू शकत नाही. माझं नाव त्याच्याबरोबर जोडलं जातं आहे याची त्याला कल्पनाही नव्हती", असे तिने म्हटले. त्यापुढे ती म्हणाली, "आमच्या वयाबद्दल अनेक चर्चा सुरु असतात. मी २९ वर्षांची आहे आणि तो २५ वर्षांचा आहे. आम्ही सुरुवातीला एकमेकांशी बोलायचो. पण आता आमच्यात काहीही गप्पा होत नाहीत." सायलीने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे ऋतुराज आणि तिच्या नात्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आणखी वाचा : “ओंकारने आधीच सांगितलं असतं तर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक स्पष्टच बोलले दरम्यान सायली ही 'काही दिया परदेस' या मालिकेतून घराघरात पोहोचली. तिने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर सायलीने सिनेसृष्टीत तिचे अढळ स्थान निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी ती 'हर हर महादेव' या चित्रपटात ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका साकारत होती. त्याबरोबरच तिची प्रमुख भूमिका असलेला 'गोष्ट एका पैठणी'ची हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरताना दिसत आहे.