Mahesh Tilekar Cryptic Post: प्रसिद्ध निर्माते – दिग्दर्शक महेश टिळेकर यांची नवीन पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टमध्ये महेश टिळेकर यांनी मराठी अभिनेत्री लाळघोटेपणा करत करीना कपूरच्या मागे गेल्याचा एक किस्सा सांगितला आहे. महेश टिळेकर यांची पोस्ट व्हायरल होताच सोशल मीडियावर अनेकांनी ही अभिनेत्री कोण असेल याचे अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. अलीकडेच इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांचा एक व्हिडीओ पाहताना त्यांनी सांगितलेल्या किस्स्यावरून मराठी तारका शो च्या वेळी घडलेला हा प्रसंग टिळेकर यांनी सांगितला आहे.

महेश टिळेकर यांची पोस्ट

नुकताच इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्या इंटरव्ह्यूचा एक व्हिडिओ पाहिला ज्यात ते सांगत होते की लंडनहून ते भारतात येत असताना फ्लाईट मध्ये त्यांच्या पुढच्या सीटवर करीना कपूर बसली होती. फ्लाईट मधील काही लोक नारायण मूर्ती यांच्याजवळ येऊन त्यांना अभिवादन करत होते ,दोन शब्द बोलत होते आणि लोक आपल्याला रिस्पेक्ट देतायेत म्हणून मूर्ती उभे राहून त्यांच्याशी संवाद साधत होते, पण काही चाहते करीना कपूर जवळ जाऊन तिला हॅलो म्हणत होते तर ही त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती आणि ही गोष्ट नारायण मूर्ती यांना खूप खटकल्याचे त्यांनी सांगितले आणि करिनाचा असा इगो काय कामाचा? असा प्रश्नही त्यांनी केला.

८ वर्षांपूर्वी आमचा मराठी तारका कार्यक्रमाचा परदेशातून शो करून एअरपोर्ट वर आल्यावर पुन्हा तिथे चेकिंग साठी असणाऱ्या रांगेत मी उभा होतो,तर आमच्या कार्यक्रमातील एका मराठी अभिनेत्रीच्या पुढे करीना कपूर उभी होती,तिचा पासपोर्ट दाखवून ती पुढे वळताना तिचा चेहरा दिसला तसा आपली मराठी अभिनेत्री तिच्याशी बोलायला म्हणून लाळ घोटेपणा करत तिच्या मागे धावत गेली पण करीना तिला फाट्यावर मारत झपाझप पावले टाकत पुढे निघून गेली. बरं याच मराठी अभिनेत्रीने करीना कपूर च्या एका लोकप्रिय सिनेमात एका सिन साठी नगण्य भूमिका केली होती तरी देखील करीनाने तिच्याकडे मान वळवून ही पाहिलं नाही, फोटो काढणं तर दूरच.

पण हेच स्वतः च्या प्रेमात असणारे काही सेलिब्रिटी यांचा एखादा सिनेमा रिलीज व्हायचा असेल तेंव्हा जनमानसात मिसळून , चाहत्यांबद्दल प्रेम असल्याचा जो अभिनय करतात त्याला खरच तोड नाही.मागे एका इंटरव्ह्यू मध्ये हिंदीत काम करणारी मराठी अभिनेत्री राधिका आपटे हिने तिला लोकांना फोटो,सेल्फी द्यायला आवडत नाही, ती सही पण देत नाही चाहत्यांना असं सांगत होती. पण काहीच दिवसांपूर्वी OTT वर रिलीज झालेल्या तिच्या एका हिंदी सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने मात्र सोशल मीडियावर पॉप्युलर असणाऱ्या काही इन्फ्लुंसर बरोबर सेल्फी देऊन स्वतः ची प्रसिध्दी करून घेत होती. बरं या बयेला ती कुठं राहते तो पत्ता पण लोकांना, तिच्या चाहत्यांना कळू नये असं वाटतं.

जर समजलं लोकांना ही कुठं राहते मुंबईत तर काय फरक पडणार आहे? अमिताभ बच्चन,सलमान,शाहरुख यांना पहायला जशी गर्दी जमते तसा जनसमुदाय हीची एक झलक दिसावी म्हणून हिच्या बिल्डिंग बाहेर जमा होणार आहे का? जेंव्हा कामे मिळणं बंद होतं, प्रसिद्धीचा काळ संपतो तेंव्हा कुणीतरी आपली दखल घ्यावी म्हणून बेचैन होणारे अनेक नट नट्या मी जवळून पाहिले आहे.

हे ही वाचा<< ‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्माचे ‘हे’ Video पाहून मराठी प्रेक्षक झाले प्रचंड आनंदी! म्हणतात, “तुझं बोलणं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या पोस्टच्या कमेंटमध्ये अनेकांनी टिळेकर यांचे म्हणणे अगदी योग्य असून अनेकदा सेलिब्रिटी फॅन्सच्या बाबत अशीच वागणूक देत असल्याचे लिहिले आहे.