मराठीतील सदाबहार अभिनेत्री म्हणून वर्षा उसगांवकर यांना ओळखले जाते. त्यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत अभिनयाचा एक वेगळचा ठसा उमटवला आहे. सध्या वर्षा उसगांवकर या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत नंदिनी शिर्के पाटील ही भूमिका साकारत आहे. त्या नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. नुकतंच वर्षा उसगांवकर यांनी कोळी समाजाची हात जोडून माफी मागितली आहे. त्यांनी याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्या एका मासे विक्रेत्या ऑनलाईन कंपनीबाबत बोलताना दिसत आहेत. यात त्यांनी कोळी समाजाच्या बंधू-भगिनींची हात जोडून माफी मागितली आहे. याद्वारे त्यांनी या वादावर पडदा टाकला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : एका पोलिसाने लिहिलं होतं सिद्धार्थ-कतरिनाचे ‘काला चष्मा’ सुपरहिट गाणं, मानधन म्हणून मिळालेले एवढे पैसे

“नमस्कार मी वर्षा उसगांवकर, यामिली या अॅपबद्दल बोलताना जर माझ्याकडून कोळी समाजाच्या काही भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्यांची हात जोडून माफी मागते. त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. त्याउलट कोळी समाजाबद्दल मला नितांत आदर आहे. त्यामुळे कोळी समाजाच्या बंधू-भगिनींची मी पुन्हा एकदा हात जोडून माफी मागते. धन्यवाद”, असे त्यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.

https://fb.watch/fnWD8ZwS-E/

आणखी वाचा : अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप-गरुडझेप’मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता

नेमकं प्रकरण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्षा उसगावकर यांनी नुकतंच एका मासे विक्रेत्या कंपनीची जाहिरात केली होती. ‘बाजार की मच्छी के साथ बदबू फ्री’ अशा आशयाची ही जाहिरात होती. त्यात त्यांनी मासे विक्रेत्या कोळी महिला ग्राहकांची फसवणूक करत असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे कोळी महिला विक्रेत्या चांगल्याच संतापल्या होत्या. वर्षा उसगावकरांचे हे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे. दोन वेळेच्या जेवणासाठी जीवाचे राण करणाऱ्या मासे विक्रेत्या कोळी महिलांचा हा अपमान आहे. एका कष्टकरी महिलेचा अपमान मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज महिला कलाकारांकडून होणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. यातून गरिबांच्या प्रती असलेली मानसिकता प्रखरपणे दिसत आहे, असे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती महिला अध्यक्षा नयना पाटील म्हटलं होतं. त्यासोबतच त्यांनी कोळी समाजाची माफी मागावी अन्यथा सडलेले मासे खाऊ घालू अशा शब्दांत त्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला होता.