प्रतिक्षा संपली!, ‘या’ तारखेपासून सुरू होणार ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझन

‘अनलॉक एंटरटेनमेंट’ ही टॅगलाइन घऊन हा शो आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय.

big-noss-marathi
(Photo-PR)

जगभरात चर्चेत असणारा, प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवलेला, वादग्रस्त मात्र तितकाच मनोरंजक, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस”. सध्या ‘बिग बॉस ओटीटी’ चर्चेत असताना आता मराठी प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच ‘मराठी बिग बॉस’चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘अनलॉक एंटरटेनमेंट’ ही टॅगलाइन घऊन हा शो आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय.

१९ सप्टेंबरपासून कलर्स मराठी वाहिनीवर ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होतेय. ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये या वेळेस कोणते ख्यातनाम व्यक्ती जातील याविषयाचे तर्क बांधण्यास देखील सुरुवात झाली आहे. बिग बॉस मराठीच्या दोन्ही पर्वांना अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर जेव्हा कार्यक्रमाचा नवा टिझर वाहिनीवर दिसला तेव्हापासून या कार्यक्रमबद्दलच्या बऱ्याच चर्चा पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये सुरु झाल्या. मग तो बिग बॉसचा आवाज असो, बिग बॉसच्या घरातील छोट्या मोठ्या गोष्टी वा किस्से. तसचं बिग बॉस मराठीचे घर असो. मात्र लवकरच प्रेक्षकांची उत्सुकता संपणार आहे.

हे देखील वाचा: नवरी नटली…, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाचा ब्रायडल लूक चर्चेत

प्रेक्षकाचं मनोरंजन करण्यासाछी बिग बॉसचं घर सज्ज झालं आहे. बिगबॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार असून त्यांनी नुकतेच या कार्यक्रमाच्या प्रोमोचे शूट संपवले. तेव्हा लवकरच कळेल कोण कोण असणार आहेत या सिझनमधील सदस्य, कसे असणार यावेळेसचं घरं ! यासाठी प्रेक्षकांना १९ सप्टेंबरची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi big boss season 3 will start sonn know the date and time kpw

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या