‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून आर्या आंबेकर घराघरांत पोहोचली. यानंतर ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. आर्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिने नुकतीच शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टद्वारे आर्याने तिच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचं फुटेज आणि ऑडिओ तिच्या परवानगीशिवाय वापरल्यामुळे जाहीरपणे संताप व्यक्त केला आहे.

आर्याने लाइव्ह कार्यक्रमांमध्ये गायलेली गाणी काही लोकांनी रेकॉर्ड करून अनेक युट्यूब चॅनल्सवर तिच्या परवानगीशिवाय वापरली आहेत. याबद्दल अभिनेत्रीने पोस्ट शेअर करून संगीतकार आणि गायकांना सतर्क केलं आहे. आर्याने या युट्यूब चॅनेल्स विरोधात कॉपीराईटचा दावा करण्याचा प्रयत्न केला परंतु, तिच्याकडे मूळ कार्यक्रमांचे व्हिडीओ नसल्याने ती काहीच करु शकत नाही. यावर तोडगा कसा काढायचा असा सवाल आर्याने या व्हिडीओद्वारे उपस्थित केला आहे.

हेही वाचा : ‘अ‍ॅनिमल’ गाजवणारे उपेंद्र लिमये सोशल मीडियापासून का राहतात दूर? कारण सांगत म्हणाले, “दुर्दैवाने आपल्यावर…”

आर्याने हा संपूर्ण व्हिडीओ इंग्रजी भाषेत शेअर केल्याने काही नेटकऱ्यांनी यावर आक्षेप नोंदवत तिला मराठी भाषेत संवाद साधण्यास सांगितलं होतं. या ट्रोलर्सला आर्याने कमेंट सेक्शनमध्ये उत्तर देत आपली बाजू स्पष्ट केली आहे.

हेही वाचा : अखेर मायलेकी सायली-प्रतिमा आल्या आमनेसामने! ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, पाहा प्रोमो…

आर्या ट्रोलर्सला कमेंट सेक्शनमध्ये उत्तर देत लिहिते, “जी जी लोकं मी मराठीत बोलले नाही म्हणून नाराजी व्यक्त करत आहेत, त्यांना सांगावंस वाटतंय, मला तुमच्या भावना कळताहेत, पण माझ्याबरोबर झालेली ही फसवणूक इतर भाषेतल्या सुद्धा कुठल्याच गायकांबरोबर व्हायला नको असं मला मनापासून वाटतं… आणि त्यासाठीच सगळ्यांना कळेल अशा इंग्रजी भाषेत मी व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू प्रत्येक संगीतकाराला अलर्ट करणे हा होता. तरीही तुमच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून मी सॉरी म्हणते. तुम्ही सुद्धा मुख्य मुद्दा काय आहे ते समजून घेतलंत तर मला बरं वाटेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गायिकेने केलेल्या तक्रारीची दखल घेत काही नामांकित कंपन्यांनी आर्याचे कॉपीराईट असलेली गाणी ताबडतोब काढून टाकली आहेत. याबद्दल तिने या दोन्ही कंपन्यांचे टॅग करून आभार मानले आहेत.