रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांनी सध्या प्रेक्षकांना वेड लावलं आहे. गेले अनेक दिवस त्यांचा ‘वेड’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. अखेर ३० डिसेंबरला तो सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलेलं आहे. या चित्रपटाचे सर्वच शो सध्या हाऊसफुल असलेले पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांबरोबरच बॉलिवूड कलाकारांनाही भुरळ घालायला हा चित्रपट कमी पडला नाही. अभिनेता अभिषेक बच्चन याने आता एक पोस्ट लिहित रितेश-जिनिलीयाचं कौतुक केलं आहे.

अनेक दिवस रितेश आणि जिनिलीया त्यांच्या ‘वेड’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत होते. या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं. तर त्याची पत्नी जिनिलीया देशमुख हिने मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं आहे. तसं असलं तरीही हा चित्रपट दमदार कामगिरी करताना दिसतोय. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने २० कोटींहून अधिक कमाई केली. याबद्दल आता अभिषेक बच्चन याने रितेश-जिनिलीसाठी एक खास पोस्ट लिहित त्यांचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : Video: रितेश देशमुखच्या प्रश्नाचं करीना कपूरने दिलं मराठीत उत्तर, म्हणाली…; व्हिडीओ व्हायरल

अभिषेकने नुकतीच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली. या चित्रपटाने एका आठवड्यात २० कोटींहून अधिक कमाई केल्याचा फोटो शेअर करत त्याने लिहिलं, “हे जबरदस्त आहे. रितेश-जिनिलीया, तुम्ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तुम्हाला मिळत असलेल्या यशाबद्दल मी खूप आनंदी आहे.”

अभिषेकने शेअर केलेली ही स्टोरी जिनिलीयानेही रिपोस्ट केली आणि त्याचे आभार मानले. तिने लिहिलं, “तुझे मनापासून आभार अभिषेक. सुरुवातीपासूनच तू माझ्या आणि रितेशच्या पाठी उभा होतास. मी हे असंच म्हणत नाहीये, आपलं याबद्दल आधी बोलणं झालं आहे.”

हेही वाचा : “… तर आज ‘वेड’ माझ्याऐवजी ‘त्याने’ दिग्दर्शित केला असता,” रितेश देशमुखचा चित्रपटाबाबत मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. त्याचप्रमाणे अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे.