‘देऊळबंद’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘धर्मवीर’ अशा अनेक चित्रपटांमुळे अभिनेता गश्मीर महाजनी घराघरांत लोकप्रिय झाला. आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. गश्मीर हा ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मुलगा आहे. २०१० मध्ये त्याने आपल्या सिनेक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली.

हेही वाचा : एक दोन नव्हे तर परिणीती चोप्राचा रॉयल लेहेंगा बनवण्यासाठी लागले तब्बल ‘एवढे’ तास, मनीष मल्होत्राचा खुलासा ऐकून व्हाल थक्क

अभिनेता गश्मीर महाजनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो दर रविवारी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ‘आस्क गॅश’ सेशन घेतो. या सेशनमध्ये गश्मीरचे चाहते त्याला अनेक प्रश्न विचारतात. नुकत्याच घेतलेल्या ‘आस्क गॅश’ सेशनमध्ये अभिनेत्याच्या चाहत्याने त्याला स्वामी समर्थांबद्दल प्रश्न विचारला.

हेही वाचा : “शिवशंभूचा अवतार जणू…”, ‘सुभेदार’नंतर दिग्पाल लांजेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा, पहिली झलक आली समोर

“स्वामींबद्दल काय सांगशील? ‘देऊळबंद’ खूप वेळा पाहिलाय राघव शास्त्री कमाल…” चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर देत गश्मीर म्हणाला, “स्वामींच्या आशीर्वादाने मी माझ्या करिअरची सुरूवात केली. मला नेहमीच ते प्रत्येक गोष्टीत मार्ग दाखवतात आणि तो मार्ग मी मोकळ्या हातांनी स्वीकारतो.”

हेही वाचा : परिणीती चोप्रा-राघव चड्ढांच्या लग्नाला गैरहजेरी, बहिणीच्या लग्नाच्या फोटोंवर कमेंट करत प्रियांका चोप्रा म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
actor gashmeer mahajani replies to his fans
गश्मीर महाजनी पोस्ट

दरम्यान, प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळबंद’ हा चित्रपट २०१५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. श्री स्वामी समर्थांची भक्ती आणि उपासना यावर या चित्रपच आधारित होता. अभिनेता गश्मीर महाजनीने यामध्ये डॉ. राघव शास्त्री ही मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी स्वामी समर्थांची भूमिका साकारली होती. सध्या या चित्रपटाच्या सीक्वेलचं काम सुरु असून लवकरच दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं होतं.