scorecardresearch

“मराठी चित्रपटांतील विनोदाचा दर्जा…” रितेश देशमुखचं वक्तव्य चर्चेत

मराठी चित्रपटांमध्ये तो आतापर्यंत कधीही विनोदी भूमिकेत दिसला नाही.

riteish

अभिनेता रितेश देशमुख याने मराठी बरोबरच हिंदी मनोरंजनसृष्टी करत प्रेक्षकांना भारावून टाकलं आहे. गेले काही महिने त्याच्या ‘वेड’ या चित्रपटामुळे त्याला सर्वत्र प्रेम मिळत आहे. या चित्रपटाने दमदार कमाई केली. या चित्रपटाच्या माध्यमातून तो अनेक वर्षांनी मराठी चित्रपटामध्ये झळकला. तर आता त्याने मराठी चित्रपटांमधील विनोदाच्या दर्जावर भाष्य केलं आहे.

रितेशने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या आहेत. परंतु आत्तापर्यंत त्याने जितके मराठी चित्रपट केले त्यामध्ये त्याने साकारलेल्या पात्रांना ॲक्शन, रोमँटिक आणि गंभीर छटा होत्या. मराठी चित्रपटांमध्ये तो आतापर्यंत कधीही विनोदी भूमिकेत दिसला नाही. पण आता त्याचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.

आणखी वाचा : “दादा, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती…”; ‘त्या’ पोस्टमुळे रितेश देशमुख ट्रोल

झी मराठी रेड कार्पेटवर त्याने हजेरी लावली होती. यावेळी ‘लोकमत’शी बोलताना त्याला विचारण्यात आलं की, “अशी कुठली भूमिका आहे जी तुला साकारण्याची खूप इच्छा आहे?” त्यावर तो म्हणाला, “‘लय भारी’मध्ये मी ॲक्शन केली, ‘वेड’मध्ये रोमँटिक भूमिका साकारली. आता मला मराठीत विनोदी भूमिका साकाराची इच्छा आहे. हिंदी चित्रपटांमध्ये मी अनेक विनोदी भूमिका केल्या. पण मराठीत मी अजूनही विनोदी भूमिका साकारलेली नाही. मराठी चित्रपटांमधील विनोदाचा दर्जा खूप वेगळा आहे. त्यामुळे मला विनोदी भूमिका साकारायची आहे.”

हेही वाचा : “मी सर्वांना ‘तुम्ही’ पण फक्त आईला ‘तू’ अशी हाक मारतो कारण…” रितेश देशमुखच्या उत्तराने जिंकलं मन

आता रितेशचं हे बोलणं सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून त्याच्या या बोलण्यातून त्याने आगामी चित्रपटाबद्दल काही हिंट दिली आहे का असा अंदाज त्याचे चाहते लावत आहेत. त्याचबरोबर त्याला मराठी चित्रपटामध्ये विनोदी भूमिकेत पाहण्याची त्याचे चाहते उत्सुकता दर्शवत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-03-2023 at 08:55 IST