राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पहाटेच्या शपथविधीपासून ते शिवसेनेतील बंडखोरी व राज्यातील सत्तापालट याबाबत अनेक खुलासे राजकीय नेत्यांकडून केले जात आहेत. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळे राज्यातील राजकारणात भूकंप आला. याबाबत गेल्या तीन दिवसांपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. आता पुढील सुनावणी २८ फेब्रुवारीला होणार आहे.

राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना आता मराठी अभिनेत्याने केलेल्या ट्वीटची चर्चा रंगली आहे. अभिनेता संदीप पाठकने राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारं ट्वीट केलं आहे. “मा.बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती की “मराठी माणूस” पंतप्रधान झाला पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपला माणूस पंतप्रधान होईल?? जरा कठीण वाटतंय…” असं संदीपने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये संदीपने राज्यातील काँग्रेस, शिवसेना, भाजपा, मनसे, आप, राष्ट्रवादी अशा सर्वच राजकीय पक्षांना टॅगही केलं आहे.

हेही वाचा>> नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचा अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप, पोलिसांत केली तक्रार दाखल, म्हणाली…

हेही वाचा>> Video: “आदिल खान बायसेक्शुअल, त्याचा न्यूड व्हिडीओ…” राखी सावंतचा धक्कादायक खुलासा, म्हणाली “त्याच्या डोक्यावर केस…”

संदीप पाठकने केलेलं हे ट्वीट सध्या चर्चेत असून यावर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. अनेकांनी कमेंटमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव पोस्ट केलं आहे. तर काहींनी खासदार सुप्रिया सुळे पंतप्रधान होऊ शकतात, असं म्हटलं आहे.

हेही वाचा>> Selfiee Box Office: अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ ठरला फ्लॉप; १५० कोटींचं बजेट असलेल्या चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संदीप पाठकने वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अनेक नाटक, मालिका व चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. संदीप सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोडींवर तो परखडपणे त्याचं मत मांडताना दिसतो.