मराठी अभिनेता सुबोध भावे हा कायमच चर्चेत असतो. सुबोधने मराठी चित्रपट, मालिका यांमध्ये त्याच्या अभिनयाच्या जोरावर ठसा उमटवला आहे. एक अष्टपैलू अभिनेता म्हणून त्याला ओळखले जाते. सुबोधने आजपर्यंत अनेक प्रसिद्ध चित्रपटांत काम केलं आहे. सुबोधच्या अभिनय कारकिर्दीतील मैलाचा दगड म्हणजे ‘बालगंधर्व’ चित्रपट. आज त्या चित्रपटाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

सुबोध भावे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘बालगंधर्व’ चित्रपटाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
आणखी वाचा : विराजस कुलकर्णी-शिवानीची रोमँटिक ट्रीप, मालदीवमध्ये राहत असलेल्या व्हिलाचे एका दिवसाचे भाडे किती? 

सुबोधने ‘बालगंधर्व’ चित्रपटातील एक खास फोटो पोस्ट केला आहे. “आज १२ वर्षे झाली “बालगंधर्व” चित्रपट प्रदर्शित होऊन”, असे कॅप्शन त्याने दिले आहे.

आणखी वाचा : “माझी आई चाळीत राहायची आणि अभिनेत्री होण्यासाठी तिने…” पलक तिवारीचे वक्तव्य चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेता नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच ‘बालगंधर्व’ यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. २० व्या शतकातील एक अतिशय प्रसिद्ध अभिनेता म्हणून बालगंधर्व यांना ओळखलं जातं होतं. ‘बालगंधर्व’ या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे यांनी ‘बालगंधर्व’ ही मुख्य भूमिका साकारली आहे. सुबोधने ‘बालगंधर्व’मध्ये स्त्रीची भूमिका साकारली होती. सुबोध भावेने आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमठवला आहे.