‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ३० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल होत आहेत. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा अभिनय याबरोबरच या चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. या चित्रपटातील ‘मंगळागौर’ हे गाणं अभिनेत्री अदिती द्रविड हिने लिहिलं आहे. त्याबद्दल तिचं खूप कौतुक होत आहे. आता तिची एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

या चित्रपटातील ‘मंगळागौर’ या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या गाण्याने यूट्यूबवर २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळविले आहेत. हे गाणं अदितीने लिहिलं आहे. हे गाणं चित्रपटाच्या शेवटी असून यात सगळ्या अभिनेत्री मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसत आहेत. हे गाणं गेले काही दिवस खूप गाजत आहे. तर या गाण्याबद्दल अदितीचं खूप कौतुकही होत आहे. पण आता अशातच आपलं काही चांगलं होताना दिसलं की लोक नजर लावतात, असं ती म्हणाली आहे.

आणखी वाचा : ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लिहिलं आहे ‘बाईपण भारी देवा’तील अत्यंत गाजत असलेलं गाणं, अनुभव शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अदितीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत लिहिलं, “नजर लागणं हे खरं असतं. इतकी नजर लावतात लोक. दुसरे आयुष्यात प्रगती करतात कारण ते त्यांना जे मिळवायचंय त्यासाठी अथक मेहनत घेतात. जर तुम्हालाही काहीतरी मिळवायचं असेल तर नजर लावत बसण्यापेक्षा स्वतःचं कर्तुत्व वाढवा, प्लीज. याचबरोबर मला जे हवंय ते मिळवण्यासाठी मी प्रयत्न करण्याचां थांबवणार नाहीये. तुम्हाला जितका प्रयत्न करायचा तितका करा.”

हेही वाचा : “तुझी जात कोणती?” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…

अदितीने शेअर केलेली ही स्टोरी नक्की कोणाबद्दल होती हे तिने स्पष्ट केलं नसलं तरी आता या स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.