केतकी माटेगावकर हिने ‘शाळा’ चित्रपटात काम करत प्रेक्षकांची पसंती मिळवली. पण, त्याआधी ती लहान असताना तिला अनेकांनी कार्यक्रमांमध्ये गाताना पाहिलं होतं. तिला चित्रपटात काम करताना पाहून अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. तिच्या गण्याबरोबरच तिच्या अभिनयाचेही सर्वजण चाहते झाले. तसं जरी असलं तरी तिने गाणं सोडलेलं नाही. ती सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या गाण्यांचे व्हिडीओ शेअर करत असते. आता प्रेक्षकांच्या बदललेल्या गाण्याच्या आवडीबद्दल तिने मत व्यक्त केलं आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये प्रेक्षक मराठी गाणी कमी आणि इतर भाषांमधील गाणी अधिक ऐकू लागले आहेत. यात प्रामुख्याने दाक्षिणात्य गाण्यांचा समावेश आहे. सध्या अनेक दाक्षिणात्य गाण्यांना प्रेक्षक डोक्यावर घेतात; तर दुसरीकडे मोजकीच मराठी गाणी सुपरहिट होताना दिसतात. आता याबद्दल केतकीने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : “माझी २ महिन्याची लेक ५ तास उपाशी होती अन् मी…”, प्रसिद्ध मराठमोळ्या गायिकेने शेअर केला डिप्रेशनचा अनुभव

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, “आपलेच मराठी प्रेक्षक मराठी गाणी ऐकायला तयार होत नाहीत, तर दाक्षिणात्य गाण्याला डोक्यावर घेतलं जातं. प्रेक्षकांनी मराठी गाणी किमान ऐकण्याची तयारी ठेवायला हवी. ‘प्रियकरा…’ गाणं प्रदर्शित झालं तेव्हा हे दाक्षिणात्य कोणतं गाणं आहे? असं मला विचारलं गेलं, तेव्हा मला धक्काच बसला. आपल्याच लोकांना नवी मराठी गाणी माहीत नसतात. त्यांचीही काही जबाबदारी असते.”

हेही वाचा : “अक्षु मला सोडून गेला अन्…” भावाच्या निधनानंतर केतकी माटेगावकरला दुःख अनावर, शेअर केली भावूक पोस्ट 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणाली, “आज प्रसिद्धीची अनेक माध्यमं असूनही त्यात मराठी गाणं मागे पडतंय. मी मराठी गाण्यांबाबत ‘अपडेट’ राहण्याची रसिकांना विनंती करते. तसंच निर्मात्यांबरोबर चित्रपटाच्या सगळ्या टीमनेही गाणी रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंग केलं पाहिजे.”