क्रांती रेडकर ही मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. २०१७ मध्ये अभिनेत्रीने सरकारी अधिकारी समीर वानखेडेंशी लग्न केलं. या जोडप्याला झिया व झायदा अशा दोन जुळ्या मुली आहेत. क्रांती तिच्या मुलींचे विविध किस्से नेहमीच इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. परंतु, अभिनेत्रीने व्हिडीओमध्ये आजवर एकदाही तिच्या मुलींचा चेहरा दाखवला नाही. तरीही त्यांच्या मजेशीर व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. अभिनेत्री झिया-झायदाला प्रेमाने छबील आणि गोदो अशी हाक मारते.

क्रांतीने आपल्या दोन्ही मुलींसाठी इलेक्ट्रिक पिगीबँक ऑनलाइन ऑर्डर केली होती. अभिनेत्रीच्या दोन्ही मुलींना गेल्या अनेक दिवसांपासून ही पिगीबँक हवी होती. अखेर पिगीबँकची डिलिव्हरी लवकरच घरी येणार हे क्रांतीच्या लेकीला आदल्या दिवशी समजलं आणि छबीलने दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जाण्यास नकार दिली. याचा खास व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रावर शेअर केला आहे.

हेही वाचा : अधिपती मास्तरीणबाईंना काढणार घराबाहेर! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत भुवनेश्वरीमुळे येणार मोठा ट्विस्ट, पाहा प्रोमो

क्रांतीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये छबील शाळेत जायचं नाही म्हणून जोरजोरात रडत असल्याचं ऐकू येत आहे. नवीन पिगीबँक मिळणार या उत्साहात तिला शाळेत जाण्याची अजिबात इच्छा नसते. तसेच “जर तू मला शाळेत पाठवलंस, तर अर्ध्या दिवसांनी मला पुन्हा घ्यायला ये” असं रडत-रडत क्रांतीची लेक तिला या व्हिडीओमध्ये सांगत आहे.

हेही वाचा : ‘स्वाभिमान’ फेम अभिनेत्रीची कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेत होणार एन्ट्री! साकारणार ‘ही’ भूमिका

दुसऱ्या दिवशी सकाळी दोघींची शाळेची तयारी पूर्ण झाल्यावर घरी पिगीबँकची डिलिव्हरी करण्यात येते. शाळेत जाण्यापूर्वी पिगीबँक पाहायला मिळणार म्हणून दोघीही प्रचंड आनंदी होतात. छबील मोठ्या उत्साहात आईने दिलेले दहा रुपये या पिगीबँकमध्ये टाकते. छबील-गोदोचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्रीने शेअर केलेल्या या मजेशीर व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. “किती सुंदर पिगीबँक आहे”, “या दोघीही अतिशय गोड आहेत”, “यांचे चेहरे दिसत नसले तरीही आम्हाला छबील-गोदो खूप जवळच्या वाटतात” अशा कमेंट्स अभिनेत्रीच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.