मृण्मयी देशपांडेची लाडकी बहीण गौतमी देशपांडे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेतून ती घराघरांत पोहोचली. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता स्वानंद तेंडुलकरला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर आज गौतमी-स्वानंदने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची जाहीर कबुली देत मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.

गौतमी देशपांडेच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याला कॅप्शन देत अभिनेत्री लिहिते, “अखेर तो दिवस आला. माझ्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. हा दिवस माझ्या कायम स्मरणात राहणार…लव्ह गौतमी”

गौतमीची मोठी बहीण अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने शेअर केलेल्या एका कौटुंबिक फोटोमुळे गौतमी-स्वानंदच्या रिलेशनशिपच्या चर्चांना सुरुवात झाली होती. परंतु, तेव्हा या दोघांनीही या नात्याबाबत मौन बाळगलं होतं. अखेर आज एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

हेही वाचा : मुहूर्त ठरला, मंडप सजला! स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णीच्या घरी लगीनघाई, शेअर केला मेहंदी सोहळ्यातील फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सध्या गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकरवर मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. दोघांच्या लग्नाला जवळचे मित्रमंडळी व नातेवाईक हजेरी लावणार आहेत.