सध्या सगळीकडे दिवाळीचं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. कलाक्षेत्रामधील मंडळींही दिवाळी सण साजरा करण्यामध्ये रमली आहेत. बॉलिवूड मंडळींनी तर दिवाळी पार्टीचं खास आजोजन केलं आहे. त्यादरम्यानचे काही व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचबरोबरीने मराठी कलाकार यांचा उत्साहही पाहण्यासारखा आहे. कोणी कुटुंबाबरोबर, कोणी फराळ बनवत तर कोणी चित्रीकरणाच्या सेटवर दिवाळी साजरी करत आहे. आता अभिनेत्री प्राजक्ता माळीने दिवाळीबाबत खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ब्रेक घेत समीर चौगुले ऑस्ट्रेलियाला रवाना, कारण…

इतर कलाकारांप्रमाणेच प्राजक्ताही सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसते. आताही तिने दिवाळीच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्याचबरोबरीने खास संदेशही तिने सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

प्राजक्ताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या सेटवरील मराठमोळ्या अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ताने गुलाबी रंगाची साडी परिधान केली असल्याची दिसत आहे. लक्षवेधी दागिने, केसात गजरा असा प्राजक्ताचा लूक पाहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा – Video : प्लाझा चित्रपटगृहाबाहेरच झोपायचे सिद्धार्थ जाधवचे वडील, अभिनेत्याला रडू कोसळलं, म्हणाला, “टॉवरमध्ये घर…”

प्राजक्ता म्हणाली, “शुभ दिपावली… सणाचा मनसोक्त आनंद लूटा, फराळावर आडवा हात मारा, फटाके शक्यतो फोडू नका (ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळा), आप्तेष्टांना भेटा, हसत रहा आणि हसण्यासाठी बघत राहा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’.” प्राजक्ताच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी तिला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.