सर्वजण आपल्या कुटुंबीयांबरोबर गुढीपाडवा साजरा करत आहेत. आज अनेक सेलिब्रिटींनी गुढीपाडवा निमित्त विविध पोस्ट शेअर करत त्यांच्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. पण आता अभिनेता आदिनाथ कोठारेच्या या व्हिडीओवर नेटकरी आश्चर्य व्यक्त करू लागले आहेत.

मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये आदिनाथ कोठारे याचंही नाव सामील आहे. मराठी बरोबरच हिंदी मनोरंजनसृष्टीतही त्याने स्वतःची ओळख निर्माण केली. त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आदिनाथ देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध पोस्ट शेअर करत चाहत्यांना त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी सांगत असतो. आता गुढीपाडव्यानिमित्त त्यांच्या घरी जेवणाचा काय खास बेत आहे हे त्याने चाहत्यांना दाखवलं.

आणखी वाचा : Video: कोल्हापूरच्या शोभायात्रेत प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने चालवला दांडपट्टा, व्हिडीओ चर्चेत

आदिनाथ कोठारेने आज त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये आदिनाथ आणि त्याचे वडील महेश कोठारे त्यांच्या स्वयंपाकघरात दिसत असून आज त्यांच्या घरी जेवायला काय बनवलं आहे हे दाखवत आहेत. या व्हिडीओत आदिनाथ म्हणतो, “आम्हाला गुढीपाडवा सर्वात जास्त का आवडतो तर याचं कारण म्हणजे जेवण. आज आपल्या घरी जेवायला काय केलंय दाखवा डॅडू.” यानंतर महेश कोठारे अत्यंत उत्साहाने पातेल्यावरचं झाकण काढतात आणि म्हणतात, “हा आहे साखर भात आणि साखर भाताबरोबर उत्कृष्ट कॉम्बिनेशन ते म्हणजे मटण.”

हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने लिहिलं, “तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या पोट भरून शुभेच्छा! तुमच्या माहितीसाठी – कोठारे हे पाठारे प्रभू आहेत. काही खास दिवशी साखर भात आणि मटण खाण्याची ही आमची २०० वर्षांपेक्षा जुनी प्रथा आहे. ही आपल्याकडील एक सुंदर परंपरा आहे आणि विविध समुदायांमध्ये भिन्न प्रथा आहेत हे पाहणं खूप सुंदर आहे. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.”

हेही वाचा : “माझ्या नावाच्या मध्यभागी महेश कोठारे हे नाव असल्यामुळे…”, आदिनाथ कोठारेचा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदिनाथने हा व्हिडीओ पोस्ट करताच नेटकऱ्यांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. एक नेटकरी म्हणाला, “साखर भाताबरोबर मटण कुठून आलं?” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “तुम्ही गुढीपाडव्याला मटण खाता!” याबरोबरच अनेकांनी या बेताचं कौतुक केलं. “आम्हालाही तुमच्या घरी जेवायला यायला आवडेल,” “आम्हाला आधी का नाही सांगितलं? आम्हीही आलो असतो,” “आम्हालाही कधीतरी बोलवा,” अशा विविध कमेंट्स करत नेटकरी त्यांना हा बेत आवडल्याचं सांगत आहेत.