‘सैराट’ चित्रपटातून महाराष्ट्रातील घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. रिंकूचे साडीतले फोटो कायम चर्चेत असतात. नुकतेच रिंकूने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोcवर ‘सैराट’ फेम अभिनेता आकाश ठोसरने केलेली कमेंट चर्चेत आहे.

“तुम्हाला लाज…” Oscar 2023 च्या होस्टने ‘आरआरआर’ला ‘बॉलिवूड चित्रपट’ म्हटल्याने संतापले नेटकरी

रिंकूने गुलाबी रंगाच्या साडीतले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने हातात गुलाबाची फुलं घेतली आहेत. तसेच केसांमध्येही गुलाबाची फुलं माळली आहेत. तिने गळ्यात एक नाजुकसा नेकलेस घातला आहे. तिच्या या फोटोंवर चाहते भरभरून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

अभिनेता आकाश ठोसरनेही तिच्या फोटोंवर कमेंट केली आहे. त्याने रेड हार्ट स्मायली असलेला इमोजी कमेंट केला आहे. रिंकूनेही त्याला इमोजी कमेंट करत रिप्लाय दिला आहे. आकाशशिवाय सायली संजीवनेही तिच्या फोटोवर कमेंट केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
rinku
रिंकूच्या फोटोंवर आकाशची कमेंट (फोटो – स्क्रीनशॉट)

रिंकूच्या फोटोंवर चाहतेही कमेंट्स करत आहेत. ‘रिंकू खूप सुंदर दिसत आहेस’, ‘अप्रतिम सौंदर्य’ अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.