मराठमोळा अभिनेता आकाश ठोसर त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. सैराटमधून प्रसिद्धी मिळवलेला आकाश ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आकाशने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. यादरम्यान आकाशने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाच्या निमित्ताने आकाश ठोसर व सायली पाटीलने ‘हंच मीडिया’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत आकाशने चित्रपटाबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही भाष्य केलं. मुलाखतीत विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांना आकाशने अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली. नागराज मंजुळेंबाबत आकाश म्हणाला, “अण्णा नेहमी सकारात्मक असतात. त्यांच्याकडे बघून मला प्रेरणा मिळते. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. माझ्या आयुष्यात काहीही झालं तरी पहिला फोन मी त्यांना करतो.”

हेही वाचा>> “मला वैभव तत्ववादी आवडायचा” प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ वक्तव्यावर अभिनेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला “तिने मला…”

पुढे आकाश म्हणाला, “भविष्यात मुलगी आवडली आणि माझी हिंमत नाही झाली, तर मी अण्णांना सांगणार. मी नागराज मंजुळेंना फोन करुन सांगणार, अण्णा मला ही मुलगी आवडते. माझी हिंमत नाही झाली तर मी अण्णांना सांगणार.”

हेही वाचा>> “एक्स गर्लफ्रेंड बघून जळत असेल” आकाश ठोसरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला “मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट ७ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आकाश ठोसर, सायली पाटील, नागराज मंजुळे व सयाजी शिंदे मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. नागराज मंजुळेंनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर हेमंत अवताडेंनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.