‘घर बंदूक बिरयानी’ या मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटातून मराठमोळा अभिनेता आकाश ठोसर पुन्हा एकदा हटके भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या आकाश ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आकाश अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. अशाच एका मुलाखतीत आकाशने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या आकाश ठोसर व सायली पाटीलने नुकतीच ‘चिंगारी अॅप’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत आकाश व सायलीबरोबर एक गेम खेळण्यात आला. ‘नेव्हर आय हॅव एव्हर’ या गेममध्ये आकाशला काही प्रश्न विचारण्यात आले. आकाशने या गेममध्ये विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांना अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली.

हेही वाचा>> “…म्हणून मी व्हॅनिटी व्हॅन वापरते”, कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतमी पाटीलचा खुलासा, म्हणाली “पडद्याच्या रुममध्ये…”

“एक्सला टोमणे मारायचे म्हणून पोस्ट टाकली आहे का?” असा प्रश्न आकाशला विचारला गेला. यावर उत्तर देत आकाश म्हणाला, “अजिबात नाही. एक्स अशीच बघून जळत असेल. त्यासाठी मला पोस्ट वगैरे टाकायची गरज नाही”. त्यानंतर आकाशला “मुलीने प्रपोज केल्यावर नकार दिलाय का?” असा प्रश्नही विचारण्यात आला. “खरं सांगू का, सैराटआधी माझ्याकडे एकही मुलगी बघत नव्हती. पण आता मला सगळ्यांकडून खूप प्रेम मिळत आहे. मुली परश्यावर, आकाशवर खूप प्रेम करतात. आणि तेवढंच प्रेम मी त्यांच्यावरही करतो,” असं आकाश म्हणाला.

हेही वाचा>> “मी दोन वेळा पोलीस भरतीसाठी…” आकाश ठोसरचा खुलासा, म्हणाला “सैराटनंतर…”

“क्रशवर छाप पाडण्यासाठी कधी ट्राय केलंस का?” असंही आकाशला विचारण्यात आलं. यावर आकाशने “कधीच नाही. आपण जसं आहोत, तसं राहायचं. यावरच मुली फिदा होतील,” असं उत्तर दिलं. आकाशने मुलाखतीदरम्यान केलेलं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. सैराटमधून प्रसिद्धी मिळवलेला आकाश अनेक मुलींचा क्रश आहे.

हेही वाचा>> Video: “कुठे गेली हडळ?”, ‘घर बंदूक बिरयानी’मध्ये हटके भूमिकेत दिसणार नागराज मंजुळे, व्हिडीओत दिसली झलक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट येत्या ८ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आकाश ठोसर, सायली पाटीलसह सयाजी शिंदे व नागराज मंजुळेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हेमंत अवताडेंनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.