महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाशी अक्षय कुमारचं नाव जोडलं गेलं. या चित्रपटामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याचं घोषित करण्यात आलं. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमधील त्याचा लूक समोर आला आहे. त्याचा लूक पाहून अभिनेता शरद केळकर मात्र भारावून गेला आहे.

आणखी वाचा – “शिवरायांच्या भूमिकेसाठी तू अयोग्य!” अक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे…’मधील लूकमुळे चाहत्यांची निराशा; सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

अक्षयला छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये पाहण्यास प्रेक्षकही बरेच उत्सुक होते. अक्षयने ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हणत एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमधील अक्षय दिसत आहे.

शरदने अक्षयच्या या लूकमधीलच फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला. हा फोटो शेअर करत शरदने म्हटलं की, “खूप खूप शुभेच्छा. जय भवानी जय शिवाजी.” त्याची ही पोस्ट पाहून अक्षयही भारावून गेला.

आणखी वाचा – Video : अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधील व्हिडीओ समोर, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या चित्रीकरणाला सुरुवात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरदची पोस्ट स्वतःच्या इन्स्टाग्राम स्टोरीला अक्षयने रिपोस्ट केली. यावेळी अक्षयने शरदला मराठीमध्ये उत्तर दिलं. अक्षय म्हणाला, “शरद भाऊ खूप खूप धन्यवाद”. अक्षयला छत्रपती शिवाजी महारांच्या लूकमध्ये पाहून अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.