Amruta Khanvilkar : मराठी कलाविश्वाची ‘चंद्रमुखी’ म्हणून अमृता खानविलकरला ओळखलं जातं. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने अभिनेत्रीने सर्वांना भुरळ घातली आहे. आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये अमृताने काम केलेलं आहे. याशिवाय तिला उत्तम नृत्यांगणा म्हणून देखील ओळखलं जातं. ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. व्यग्र शेड्युलमधून वेळ मिळाला की, अनेकदा पोस्टवर कमेंट्स करणाऱ्या चाहत्यांना अमृता रिप्लाय देत असते.

अलीकडच्या काळात अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेणं, कमेंट्समध्ये चाहत्यांना उत्तरं देणं, आपल्या चाहत्यांशी लाइव्ह येऊन किंवा ब्रॉडकास्ट चॅनेलमध्ये संवाद साधणं असं अनेक कलाकार करतात. अनेकदा या चाहत्यांचे भन्नाट अनुभव सुद्धा सेलिब्रिटींना येतात. अमृता खानविलकरने शेअर केलेली अशीच एक स्टोरी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

अमृताला चाहत्याने घातली अजब मागणी

अमृता खानविलकरला तिच्या चाहत्याने पोस्टवर कमेंट करत थेट लग्नाची मागणी घातली आहे. हा नेटकरी लिहितो, “आय लव्ह यू, मला तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा आहे…प्लीज मला तुझा लाइफटाइम नवरा बनवशील का…प्लीज”

यावर अमृता उत्तर देत म्हणाली, “हॅलो इंडियन सुनील या ऑफरसाठी धन्यवाद पण, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. जरी तुला माझा लाइफटाइम नवरा व्हायचं असलं तरीही नाही…खरंच सॉरी” याचा स्क्रीनशॉट अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Amruta Khanvilkar
अमृता खानविलकरची पोस्ट चर्चेत ( Amruta Khanvilkar )

दरम्यान, अमृता खानविलकरबद्दल सांगायचं झालं, तर सध्या अभिनेत्री तिच्या नव्या घरामुळे चर्चेत होती. गेल्यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर अमृताने नवीन घर खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली. नुकताच तिने आपले आई-वडील, बहीण व पती यांच्या साथीने या नव्या घरात गृहप्रवेश केला. याशिवाय अमेय वाघ आणि राजसी भावे यांच्यासह अमृता शेवटची ‘लाइक अँड सब्सक्राइब’ या चित्रपटात झळकली आहे. आता येत्या काळात सुद्धा तिचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.