अभिनेत्री अमृता खानविलकर मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला तिचा ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट बराच गाजला. त्यानंतर आता लवकरच अमृता ‘ललिता शिवाजी बाबर’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही वेब सीरिज धावपटू ललिता बाबर यांच्या जीवनावर आधारित आहे आणि अमृताने इन्स्टाग्रावर त्यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

प्रसिध्द धावपटू आणि माण तालुक्यातील मोही गावची सुकन्या ललिता बाबर यांच्या जीवनावर लवकरच एक वेबसीरीज प्रदर्शित होणार आहे. यात ललिता बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानविलकर झळकणार आहे. अमृताने याची माहिती इन्स्टाग्रामवर एक पोस्टर शेअर करत दिली होती. त्यानंतर आता ललिता बाबर यांचा एक खास फोटो शेअर करत अमृताने त्यांच्यासाठी पोस्ट लिहिली आहे.

आणखी वाचा- “अशा भाषेत परत बोललात तर…” शरीर दाखवण्याच्या ‘त्या’ अश्लील कमेंट करणाऱ्या नेटकऱ्यावर अमृता खानविलकर संतापली

अमृता खानविलकरची पोस्ट-

“ललिता ताई ह्यांचा हा फोटो माझ्या साठी खूप खास आहे.
२७ जानेवारीला सकाळ सन्मान २०२३ च्या माध्यमातून आम्हाला “ललिता शिवाजी बाबर ” ह्याची एक छोटीशी झलक… मा. मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे ह्यांना दाखवायला मिळाली.
ज्या क्षणी ताईंना बोलण्यासाठी माइक दिला गेला, त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आम्हाला सगळ्यांनाच थक्क करून गेले… ताईंचा साधेपणा… त्यांचं बोलणं मनाला भिडलं… काही वाक्यांमधूनच कळत होतं की, त्या किती आतुरतेने ह्या दिवसाची वाट बघत होत्या.
हा क्षण आम्हाला दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे यांचे मनापासून आभार
प्रवास नुकताच सुरु झालाय…. अजून खूप चालायचंय… नाही पाळायचंय…”

आणखी वाचा- “आपल्याला हवं ते नेहमी मिळत नाही पण…” ‘झलक दिखला जा’ मधून बाहेर पडलेल्या अमृता खानविलकरच्या पोस्टने वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मागच्याच वर्षी प्रदर्शित झालेला अमृताचा ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट खूप गाजला होता. तिच्या या भूमिकेचं खूप कौतुकही झालं. त्यानंतर ती ‘झलक दिखला जा’ या रिअलिटी शोमध्ये दिसली होती. मराठी सिनेसृष्टीप्रमाणे बॉलिवूडमध्येही अमृताच्या नावाची चर्चा असते. तिने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मालिका, वेबसीरीजमध्ये काम केले आहे.