मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून अनिकेत विश्वासरावला ओळखले जाते. मराठी मालिका आणि चित्रपट क्षेत्रात अभिनेत्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘कळत नकळत’ या मालिकेमुळे अनिकेत प्रसिद्धीझोतात आला. सध्या तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. अनिकेतने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा : Video: “मला खरंच…” भर कार्यक्रमात शाहरुख खानने केलं मराठमोळ्या गिरीजा ओकचं कौतुक, म्हणाला…

अनिकेत विश्वासरावने अलीकडेच शेअर पोस्टमध्ये दोन नामांकित विमानकंपन्यांवर टीका केली आहे. प्रवासादरम्यान त्याला नेमका काय अनुभव आला याचा खुलासा अभिनेत्याने या पोस्टद्वारे केला आहे. या पोस्टमध्ये तो लिहितो, “चेक-इन केल्यावर जमा केलेली माझी बॅग आणि सामान गेल्या चार दिवसांपासून गायब आहे. याबद्दल विचारपूस केल्यावर तुमच्या बाजूने एकच प्रतिसाद येतोय ती म्हणजे, फक्त खोटी आश्वासने आणि दिशाभूल…परंतु, या ४ दिवसांत माझ्या बॅगेबद्दल कोणीही माहिती दिलेली नाही आणि शोधही घेतलेला नाही.”

हेही वाचा : प्रियांका चोप्राची जाऊबाई घेणार घटस्फोट? लग्नाच्या चार वर्षांनंतर सोफी टर्नर आणि जो जोनसच्या नात्यात दुरावा

अनिकेत विश्वासराव पुढे लिहितो, फक्त माफीच्या ई-मेलने माझ्या समस्येचे निराकरण होणार नाही. तुमच्या एका चुकीमुळे मला खूप त्रास सहन करावा लागला आहे. मला आशा आहे की, ही पोस्ट पाहिल्यानंतर आपण शक्य तितक्या लवकर माझ्या सामानाचा शोध घ्याल आणि समस्येचं निराकरण कराल.

हेही वाचा : “फ्लॉप चित्रपटांमुळे टार्गेट केलं”, अमीषा पटेलने बॉलीवूडबद्दल मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, “इंडस्ट्रीमध्ये गॉडफादर असता तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी एक प्रोफेशनल अभिनेता आहे. या इंडस्ट्रीत गेल्या २४ वर्षांपासून मी काम करत आहे. यापूर्वी असे अनुभव मला कधीच आलेले नाहीत. मी माझे ‘प्ले कॉस्ट्यूम’ देखील बॅगेत घेऊन जात असल्याने माझ्या व्यावसायिक कामात अडथळा निर्माण झाला आहे. मला आशा आहे की भविष्यात कोणीही अशा समस्येचा सामना करणार नाही.” अशी संतप्त पोस्ट शेअर करत अनिकेत विश्वासरावने दोन नामांकित विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांवर टीका केली आहे. दरम्यान, निष्काळजी देणाऱ्या विमानसेवा असं नमूद करत, अभिनेत्याने या दोन कंपन्यांना पोस्टमध्ये टॅग केलं आहे.