अभिनेत्री अश्विनी महांगडे ही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. गेले अनेक महिने ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर लवकरच ती ‘महाराष्ट्र शाहीर’ या बहुप्रतिक्षित चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिला अनेक उत्तमोत्तम अनुभव आले. तर आता तिने केलेली एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अश्विनीचा अनुभव हा खूपच छान होता. इतकंच नाही तर या चित्रपटाच्या निमित्ताने एक योगायोग ही घडून आला. याबाबत अश्विनीने तिच्या एका पोस्ट मधून खुलासा केला आहे.

आणखी वाचा : “चांगले बोलणारे असतात तसे वाईट पसरवणारेही असतातच…” ‘आई कुठे काय करते’तील अनघाची पोस्ट चर्चेत

अश्विनीने तिचा केदार शिंदेंबरोबरचा एक फोटो पोस्ट करत लिहिलं, “केदार सरांनी “वाई युवक केंद्र, वाई” मधून “बॉम्ब – ए- मेरी जान” ‘ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेसाठी दिग्दर्शित केलेले. ज्यात प्रदीपकुमार महांगडे म्हणजे माझे वडील नाना, युनूस काका पिंजारी, मुनीर काका बागवान या सर्वांनी अगदी उत्तम कामे केली होती. लहानपणापासून “केदार शिंदे” हे नाव ऐकत होते. कधीतरी त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळावी हे वाटणे स्वाभाविक आहे. तशी वेळ आली जेव्हा “सुखी माणसाचा सदरा ” या मालिकेसाठी ऑडिशन दिले. पण तेव्हा माझे casting झालेच नाही. आणि मी जरा निराशच झाले.”

हेही वाचा : ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या टीमने पसरणी येथे केले शाहीर साबळे यांच्या फोटोचे अनावरण, पहा त्यावेळची खास क्षणचित्रे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणाली, “‘महाराष्ट्र शाहीर “मुळे केदार सरांसोबत काम करता आले, शिकता आले. त्यांच्यात सकारात्मकता तुफान आहे. या चित्रपटाच्या शूट दरम्यान जे शिकता आले, अनुभवता आले ते सगळे अप्रतिम अनुभव आहेत. पूर्ण युनिट हाताळणे, त्यांचा बाप होवून प्रेमाने आणि प्रसंगी थोडे कठोर बोलून काम उत्तम करून घेणे हे तसे अवघड, काम उत्तम व्हावे यासाठीची तगमग, जबाबदारी पार पाडणे हेही अवघड. पण आम्हाला सोप्पे करून ते जग दाखवले त्यासाठी मी केदार सरांची ऋणी आहे आणि राहीन.” आता तिच्या या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं असून यावर तिचे चाहते कमेंट्स करत तिचं कौतुक करत आहेत.