केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट ३० जूनला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे पूर्ण झाले आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. आता या चित्रपटाने वेड चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. नुकतंच या चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

‘बाईपण भारी देवा’ चित्रपट सहा बहिणींची कथा आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहात चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा अभिनय याबरोबरच या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ नाकारणाऱ्या निर्मात्याने केदार शिंदेना केला मेसेज, म्हणाला “माझी बस चुकली, पण…”

नुकतंच केदार शिदेंनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. याला कॅप्शन देताना त्यांनी चाहत्यांचे आणि कलाकारांचे आभार मानले आहेत. ही तर श्री स्वामींची कृपा.. हा श्री सिद्धिविनायकाचा महाप्रसाद.. मराठी सिनेमाच्या इतिहासात याची नोंद घेतली जाईल. स्त्री घर चालवते तर, सिनेमा तर निश्चितच चालवू शकते. सैराट नंतरचा बाईपण ठरला महाराष्ट्राचा महासिनेमा, असे केदार शिंदेंनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “आमचा साडेतीन वर्षांचा संसार…” दोनदा घटस्फोट झालेल्या व्यक्तीबरोबर लग्न करणाऱ्या नेहा पेंडसेचे वक्तव्य, म्हणाली “लग्नानंतर स्त्रियांनाच…”

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस १२.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाच्या कमाईत दुप्पटीने वाढ झाली. या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात तब्बल २४.८५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यात तब्बल ५७.१५ कोटींची कमाई केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता या चित्रपटाने २४ दिवसात ६५.६१ कोटींचा गल्ला जमवला आहे. यामुळे रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुखच्या वेड चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. वेड चित्रपटाने २४ दिवसात ५४.४० कोटींची कमाई केली होती.