केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची चर्चा अजूनही कायम आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण झाला असला तरी प्रेक्षकांचा प्रतिसाद अजूनही मिळत आहे. सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला विशेष म्हणजे महिला वर्गानं अक्षरशः डोक्यावर घेतलं. तसेच या चित्रपटातील प्रत्येकाची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. आता ‘बाईपण भारी देवा’मधील साधना काकडे म्हणजेच अभिनेत्री सुकन्या मोने लवकरच नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. स्वप्नील जोशी व प्रार्थना बेहेरेसह मल्टीस्टारर चित्रपटातून प्रेक्षकांची मनं पुन्हा जिंकायला सुकन्या मोने येत आहेत.

हेही वाचा – ‘लोकमान्य’ फेम अभिनेत्री आता ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेत पिंकीच्या भूमिकेत दिसणार

एबीसी क्रिएशन्स निर्मित ‘इंद्रधनुष्य’ चित्रपटातून सुकन्या मोने पुन्हा झळकणार आहेत. या चित्रपटात सुकन्या यांच्यासह अभिनेता स्वप्नील जोशी, सागर कारंडे, प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील अशी जबरदस्त कलाकार मंडळी दिसणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्त नुकताच करण्यात आला. लंडनमध्ये ‘इंद्रधनुष्य’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा – कधीही न पाहिलेल्या भूमिकेत झळकणार भरत जाधव; ‘हे’ नवे नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हेही वाचा – “दीड वर्षापूर्वीच्या ‘त्या’ दिवशी…”; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष, म्हणाले, “काट लो जुबान…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा पांडुरंग जाधव सांभाळत आहेत. त्यांनी यापूर्वी ‘मनातल्या उन्हात’, ‘ड्राय डे’, ‘भारत माझा देश आहे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. एक पुरुष आणि सात बायकांच्या कथानकावर आधारित असलेला ‘इंद्रधनुष्य’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्यानिमित्तानं पहिल्यांदाच स्वप्नील जोशी लंडनमध्ये शूटिंगचा अभुनव घेत आहे.